धक्कादायक... धमकी देऊन 15 वर्षीय दिरावर वहिनीचे लैंगिक अत्याचार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

धक्कादायक... धमकी देऊन 15 वर्षीय दिरावर वहिनीचे लैंगिक अत्याचार


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- स्वतःच्याच 15 वर्षीय दिराला धमकी देऊन एका विवाहितेने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. संशयित आरोपी महिलेविरोधात लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोस्को) सातारा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगा हा १५ वर्षाचा आहे. हा मुलगा आपल्या मावशीच्या गावी यात्रेसाठी गेला होता. त्यावेळी अनावधानाने या मुलाचा महिलेला धक्का लागला. मात्र या मुलाने आपल्याना जाणूनबुजून धक्का दिल्याचा आरोप या महिलेने केला. 'तू माझ्याशी गैरवर्तन केलं असं मी तुझ्या भावाला सांगेन,' अशी धमकी या महिलेने त्या मुलाला दिली.

धमकावून या महिलेने मुलाला स्वत:शी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. तसेच यासंदर्भात कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही या महिलेने मुलाला दिली होती.
काही दिवसानंतर या महिलेने मुलाला परत धमकावले आणि पुन्हा त्याला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडलं. आपला भाचा गप्प आहे काही बोलत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याच्या मावशीने काय झालं यासंदर्भात चौकशी केली. त्यावेळी या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या मावशीला सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पीडित मुलाच्या मावशीने थेट पोलिसांमध्ये तक्रार केली. याप्रकरणात संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

add