नात्याला काळीमा... आईनं स्वतःच्या प्रियकराचं 'लग्न' पोटच्या मुलीशीच लावलं अन् घडलं ते भयानक! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 15 March 2020

नात्याला काळीमा... आईनं स्वतःच्या प्रियकराचं 'लग्न' पोटच्या मुलीशीच लावलं अन् घडलं ते भयानक!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
हैदराबाद : वृत्तसंस्था - आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासवणारी एक निंदणीय घटना समोर आली आहे. एका महिलेवर आपल्या पोटच्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या मोठ्या मुलीने आत्महत्या केली आहे आणि तिच्या 17 वर्षाच्या धाकट्या मुलीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेच्या आईचे एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते. ती या मुलीच्या वडिलांपासून विभक्त झाली होती. आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या धाकट्या मुलीने केलेल्या तक्रारीनुसार तिची आई अनिता आणि पेराम नवीन कुमार यांच्यामध्ये विवाहबाह्य संबंध होते.

तसेच पेराम हा नेहमी घरी येत असल्याचा दावा मुलीने तक्रारीत केला आहे. हा संपूर्ण प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. आईने प्रियकरासोबत असलेले संबंध कोणाला समजू नयेत यासाठी तिने मोठ्या मुलीचे लग्न लावून दिले होते. लग्नानंतर या दोघांचे संबंध मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या करून आपले जीवन संपले असा दावा लहान बहिणीने केला आहे. मीरपेट पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मृतक महिला हैदराबाद येथील महाविद्यालयात शिकत होती. तक्रारदार मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मागील डिसेंबरमध्ये तिच्या बहिणीचे लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याचं आईबरोबरचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. तेव्हा तिच्या मृत बहिणीनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच पतीचं घर सोडण्याची धमकी दिली होती. यावर तिच्या आईने तिला उलट धमकी देत सांगितलं होतं की, जर तिने घर सोडलं तर ती स्वत:च आयुष्य संपवेल.

या प्रकरणावरून मृत महिला आणि तिच्या नवऱ्यामध्ये वारंवार वाद होत होते. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास तिने एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. साडीच्या मदतीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने लिहलेल्या चिठ्ठितून न्यायाची मागणी केली आहे. आरोपींना योग्य शिक्षा व्हावी अशी मागणी या मुलीने केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

add