सीबीआयनं अरबी समुद्रातुन शोधलं दाभोळकर हत्याकांडातील पिस्तुल - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 6 March 2020

सीबीआयनं अरबी समुद्रातुन शोधलं दाभोळकर हत्याकांडातील पिस्तुल


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
दाभोळकर हत्याप्रकरणात वापरलं गेलेलं पिस्तूल सीबीआयने थेट अरबी समुद्राच्या तळातून काढलं आहे. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल शोधून काढलं गेलं आहे. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला.

दाभोलकरांच्या हत्येसाठी या पिस्तूलाचा वापर झाला होता का ? याची खात्री करून घेण्यासाठी सीबीआय ने फॉरेन्सिक तपासणीसाठी पिस्तूल पाठवलं आहे. पुणे कोर्टात दाभोलकर हत्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान सीबीआयने २०१९ रोजी ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, सध्या या पिस्तुलाची पाहणी केली जात असून यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं हे स्पष्ट होईल.

पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या दुबई स्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. अरबी समुद्रातील खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी ९५ लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला.


add