'स्वेरी' चे माजी विद्यार्थी भारत पांढरे बनले पोलीस उपनिरीक्षक - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 19 March 2020

'स्वेरी' चे माजी विद्यार्थी भारत पांढरे बनले पोलीस उपनिरीक्षक


पंढरपूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१८ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी विद्यार्थी भारत प्रकाश पांढरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
             भारत पांढरे हे पोलीस उपनिरीक्षक परीक्षामध्ये सर्वसाधारण गटातून ११९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. ते मुळचे बामणी (ता. सांगोला) येथील असून प्राथमिक शिक्षण चौथीपर्यंत जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल सांगोल्यामधून झाले. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील सायन्स महाविद्यालय,पंढरपूर मधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर गोपाळपूर (ता. पंढरपूर) च्या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कॅपद्वारे नंबर लागला आणि सन २०१६ साली पदवी संपादीत केली. 
              स्वेरीच्याच वसतिगृहात राहून नियमित अभ्यास करताना वारीच्या काळात ‘पोलीस मित्र योजना’, राष्ट्रीय स्वयंसेवक योजना’ अशा विविध उपक्रमाद्वारे समाजसेवेची संधी स्वेरीने निर्माण करून दिली याचाही त्यांना फायदा झाला. तसेच स्वेरीत होत असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. स्वेरी राबवीत असलेल्या ‘स्पर्धा परीक्षा सराव वर्ग’ याचाही या स्पर्धा परीक्षेला फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. आई- वडीलांबरोबर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्याबरोबरच इतर उच्चशिक्षित प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे पांढरे यांनी सांगितले तर स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार सरांनी वसतिगृहात रहात असताना मित्रत्वाच्या नात्याने स्पर्धा परीक्षेसाठी सतत प्रोत्साहन दिले तर स्वेरी महाविद्यालयाच्या प्रशस्त ग्रंथालयाचा माझ्या यशात मोलाचा वाटा आहे. असेही आवर्जून सांगितले. स्वेरीमध्ये विविध उपक्रमातून उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमंत्रित केले जाते. 
                त्यांचा स्पर्धा परीक्षेतील आलेला अनुभव आणि परीक्षेचे स्वरूप व सुयोग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरणा मिळत असते. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी. नाडगौडाउपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम. एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी पांढरे यांचे अभिनंदन केले.

add