कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध यात्रेदरम्यान होणाऱ्या कुस्ती स्पर्धा रद्द... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील विविध यात्रेदरम्यान होणाऱ्या कुस्ती स्पर्धा रद्द...


महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष
गोविंद बप्पा चव्हाण यांची माहिती...
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील यात्रे दरम्यान होणाऱ्या 14 ते 31 मार्च कुस्ती स्पर्धा येथील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुढील आदेश होईपर्यंत हा कुस्ती स्पर्धा घेण्यात येऊ नये,अशा सूचना जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांनी दिल्या आहेत.याबाबत अशी जिल्हाध्यक्ष गोविंद बप्पा चव्हाण यांनी माहिती दिली.

      याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे सतर्कतेचा भाग म्हणून शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील होणाऱ्या यात्रे दरम्यान कुस्ती फड स्पर्धा विविध ठिकाणी आयोजित करण्यात येतात त्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे बीड च्या वतीने सर्व कार्यक्रम व फडातील कुस्ती स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.बीड जिल्ह्यातील सर्व यात्रा महोत्सव दरम्यान भरवण्यात येणाऱ्या कुस्तीक्षेत्रातील सर्व कुस्ती स्पर्धा रद्द करण्यात आल्यात यांची नोंद सर्व जिल्ह्यातील कुस्तीक्षेत्रातील, कुस्ती प्रेमी, कु्स्ती खेळांडुंनी यांची नोंद घ्यावी.  त्यानंतर, पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा / क्रीडांगणे यांचे व्यवस्थापक / संचालक , एकविध खेळाच्या संघटनेचे अध्यक्ष / सचिव , विविध क्रीडा मंडळे यांचे अध्यक्ष / सचिव , विविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष / सचिव , विविध क्रीडा क्लब यांचे अध्यक्ष / सचिव, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष  यांना  कळविण्यात येत आहे की , राज्य शासनाने करोना विषाणूचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा - 1897 दिनांक - 13 मार्च 2020 पासून लागू केला आहे .

 त्या अनुषंगाने मा . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , बीड  यांचे आदेशानूसार आपल्या अधिपत्या खाली कार्यरत ( सूरू ) असलेल्या व्यायामशाळा , क्रीडांगणे , क्रीडा प्रशिक्षण केंद्र  हे दिनांक 31 मार्च 2020 या कालावधी पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. यांची नोंद घ्यावी अशी माहिती जिल्हाध्यक्ष गोविंद बप्पा चव्हाण जिल्हा सचिव वाघिरे सर, कोषाध्यक्ष रोपभाई, परळी तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे व सर्व महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे.

add