कोरोनामुळे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणं वाढले... रोजगार मिळणारी शहरच ओस पडल्यामुळे, शहरासह ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले ! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 22 March 2020

कोरोनामुळे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणं वाढले... रोजगार मिळणारी शहरच ओस पडल्यामुळे, शहरासह ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले !


विविध प्रकारची मार्च एन्डची वसुली वगळता सर्व कामे बंदच
पंढरपूर :  प्रतिनिधी
सध्या मार्च एन्डमुळे बँका, पतसंस्था, महिला बचत गट, नगरपरिषद कर, लाईट बिल, पाणीपट्टी आदी सह विविध प्रकारची अधिकृत वसुली पूर्ण करून घेण्यासाठी त्याचे कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन सक्तीची वसुली करून घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. परंतु अशातच मागील महिन्यापासून कोरोनोमुळे प्रत्येक ठिकाणी हालचाली बंद झाल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे शहरसह ग्रामीण भागातील लोकांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण मोठया प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळत आहे.


     कोरोनो मुळे घरातून बाहेर पडू नये या सरकार कडुन सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे आपल्या व्यवसाय आणि रोजगार यासाठी बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. परंतु नित्याचीच वसुली असलेले महिला बचत गट हप्ते आणि मार्च एन्ड ची वार्षिक वसुली यासाठी असणारी सक्ती ची वसुली मोहीम मात्र या कोरोनोला न घाबरता घाबरून बसलेल्या लोकांकडे आवर्जून दारोदार फिरून सक्तीने वसुली करत आहेत.


   या अशा वाईट परिस्थितीत सक्तीने बचत गट वसुली केली जात असताना मानसिकता बिघडली आहे. यामध्ये सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी मार्फत मायक्रो फायनान्स, पतसंस्था, बँका, यांना मुदत वाड देऊन दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.


     राज्यामध्ये शेतकरी कर्ज मुक्ती करून अनेक वेळा बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने पावले उचलली गेली आहेत. त्याच धरतीवर आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना एकवेळ या मायक्रो फायनान्स, पतसंस्था, आणि काही बँकानी जी छोटी कर्ज हप्त्याला फेड करण्यासाठी दिली आहेत. त्यावर सध्याच्या महिनाभर झालेल्या या अवस्थामुळे सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी वाढू लागली आहे.


     सध्या सरकार घरातून बाहेर पडू नये अशा सूचना देत आहे. त्यामुळे रोजच्या पोटाची अडचण असलेल्या अनेक कुटुंबाला कर्ज हप्ते देणे कठीण काम झाले आहे. त्यासाठी आता अनेक सामाजिक संघटना, राजकीय नेते, यांनी यामध्ये सरकारने मार्ग काढावा अशी निवेदन देऊन मागणी केली आहे. राज्याचे राजकारण आणि सत्तेमध्ये असलेले वजन पाहता खा. सुप्रियाताई सुळे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने याबाबत निवेदन देण्यात आले असून याबाबत लवकरच तोडगा निघेल अशी महिलांना आशा वाटू लागली आहे. सध्या महिलांना बचत गटाचे हप्ते भरणे शक्य नसल्याने सक्ती च्या वसुलीतुन मुक्ती मिळावी अशी महिला मधून मागणी वाढू लागली आहे.

add