जनता कर्फ्युमध्ये स्वेरी व स्वाईप सहभागी होणार, तुम्ही पण व्हा! - सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचे आवाहन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 21 March 2020

जनता कर्फ्युमध्ये स्वेरी व स्वाईप सहभागी होणार, तुम्ही पण व्हा! - सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांचे आवाहनपंढरपूर- ‘संपूर्ण विश्वात कोरोना व्हायरसने जीवघेणे थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वच थरातून प्रयत्न केले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार (दि.२२) सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाचे पालन करण्यासाठी आम्ही घराबाहेर पडणार नाही आणि तुम्ही देखील पडू नका.’असे आवाहन स्वेरी आणि स्वाईपचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले आहे.
         गोपाळपूर येथील ‘स्वेरी’ तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि कासेगाव येथील ‘स्वाईप’ तथा श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन या शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना यापूर्वीच सोमवार (दि.१६) पासून आपल्या शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशासनाच्या आदेशानुसार घरून व कार्यालयातून कामकाज सुरु आहे. कोरोनाचे  विषाणू बारा तास जिवंत राहू शकतात. या बारा तासात या विषाणूचा व्यक्तीच्या शरीरात प्रवेश झाला तर त्याचा प्रादुर्भाव सर्वदूर होतो. म्हणून त्या कोरोनाला मारायचे असेल तर त्याचा संसर्ग होऊ द्यायचा नाही किंवा त्यांच्या संपर्कात जायचे नाही. त्यासाठी अर्थातच एक दिवस घराबाहेर पडायचे नाही. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घराबाहेर पडू नये यासाठी भारतीय जनतेला 'जनता कर्फ्युची हाक दिली आहे. आपण सर्वांनी एक दिवस जनता कर्फ्यु पाळला तर कोरोनाचे संक्रमण होणार नाही. कोरोनाच्या विषाणूंना जागेवरच मारण्याच्या पंतप्रधान मोदींच्या जनता कर्फ्युच्या मोहिमेत रविवारी स्वेरी’ आणि स्वाईप’ शिक्षण संस्था देखील सहभागी होणार आहे आणि आम्ही हे सामाजिक कर्तव्य समजतो. म्हणून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्युच्या मोहिमेत आम्ही सहभागी होणार आहोततुम्ही सुद्धा सहभागी व्हा आणि तुमचे सामाजिक कर्तव्य पार पाडा. त्या कोरोना व्हायरसचा जागेवरच संपवा. हे तुमच्या,देशाच्या हिताचे आहे.’ असे आवाहन संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले आहे.

add