सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी ‘जनता कर्प्यु’ मध्ये सहभागी व्हावं -आ. प्रशांत परिचारक



संपूर्ण  जगात कोरोना व्हायरसने जीवघेणे थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सर्वच थरातून प्रयत्न केले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमाम भारतीयांना रविवार (दि.22) सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याला सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेने साथ द्यावी असे आवाहन सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार  22 मार्च हा दिवस स्वत:वरती कांही बंधन घालुन घ्यायचा,  स्वयंसंयम ठेवण्याचा दिवस आहे. सकाळी सकाळी 7 ते रात्री 9 आपण सर्वांनी ‘जनता कर्प्यु’ मध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आमदार परिचारक यांनी केली आहे.