“कर्मयोगी अभियांत्रीकीच्या विद्यार्थांनी बनवली इलेक्ट्रिक मोटारसायकल” पटकाविले पहिले राज्यस्तरीय पारितोषिक - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 5 March 2020

“कर्मयोगी अभियांत्रीकीच्या विद्यार्थांनी बनवली इलेक्ट्रिक मोटारसायकल” पटकाविले पहिले राज्यस्तरीय पारितोषिकइलेक्ट्रीक मोटरसायकल बरोबर विजेते विद्यार्थी, कॉलेजचे प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील व शिक्षकवृंद.
Pandharpur Live-
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित, कर्मयोगी अभियांत्रीक महाविद्यालय शेळवे, पंढरपूर येथील शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक मोटारसायकल तयार केली असुन, सदर मोटारसायकलीस एस.के.एन.कोर्टी येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक व सन्मान चिन्ह मिळाले आहे. विविध वाहनांच्या टाकाऊ पार्ट पासून एखादी इलेक्ट्रिक मोटारसायकल हि बनविता येऊ शकते, हा प्रयोग प्रत्यक्षात उतरवण्याचे काम कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. 

कर्मयोगी इंजिनीरिंग कॉलेजमधील शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी कमाल करून दाखवले आहे. या गाडीचा वेग ताशी ६० किमी आहे व तिची बॅटरी रिचार्जेबल आहे. त्यामुळे पर्यावरण पूरक अशी गाडी तयार करून विद्यार्थ्यांनी एक मोलाचा संदेश समाजासाठी दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीत वाव देण्यासाठी महाविद्यालय सदैव तत्पर असते, या साठी स्वतंत्र विभागाची सोय देखील कर्मयोगी अभियांत्रीकी महाविद्यालयांत केलेली आहे. या महाविद्यालयातील इंजिनीरिंग संशोधन विभाग (ई.आर.डी.) ईथुन विद्यार्थ्यांच्या नवनवीन प्रकल्प व कल्पना प्रत्येकक्षात
उतरवण्यात सर्व प्राध्यापक कार्यरत असतात. तसेच हे विभाग विद्यार्थ्यासाठी २४ तास कार्यरत असते.

काळाची गरज समजून प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वच मोठया कंपन्या मध्ये इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यासाठी चढाओढ सुरु असताना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक मोटोरसायकलची भर त्यात पडली आहे.

महाविद्यालयातील शेवटच्या वर्षात शिकत असलेले ब्रह्मदेव गोरड, सोमेश्वर माळी, असद पठाण, लक्ष्मण खेमनर या विद्यार्थ्यांनी हि गाडी तयार करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, प्रा. एस. बी. पताळे व प्रा. आर. जे. पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जिल्हाचे आमदार मा.श्री.प्रशांत परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील व रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी केले.

add