“सोलापूर येथील युवा महोत्सवामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाला क्रीडा विभागाचे सर्व साधारण विजेतेपद” - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 3 March 2020

“सोलापूर येथील युवा महोत्सवामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाला क्रीडा विभागाचे सर्व साधारण विजेतेपद”

विजेत्या खेळाडू समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर सर, क्रीडा मार्गदर्शक प्रा. जी. एस. बागल व प्रा. डी. व्ही. भोसले सर.
प्रतिनिधी:- इंडियन सोसायटी फाँर टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग सोलापुर लोकल सेंटर यांच्यावतीने घेण्यात आलेले इंजीनियरिंग फेस्टिव्हल सोलापूर येथील हरीभाई देवकरण प्रशाला येथे पार पडले. या अभियांत्रिकी महोत्सवांमध्ये शेळवे ये थील कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाने क्रीडा विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सदर महोत्सवा मध्ये कबड्डी, खो-खो, व्हाँलीबॉल, क्रिकेट इत्यादी मैदानी स्पर्धेमध्ये एकूण 23 मेडल व 6 ट्रॉफी मिळवत कर्मयोगी अभियांत्रिकी ने क्रीडा विभागामध्ये सर्वसाधरण विजेतेपद पटकावत आपला दबदबा कायम ठेवला. 

सर्व यशस्वी खेळाडूंचे मा. आ. सुधाकरपंत परिचारक, जिल्ह्याचे आमदार
प्रशांतराव परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, कर्मयोगी  तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, प्रशासकीय अधिकारी श्री गणेश वाळके सर, कर्मयोगी पब्लिक स्कूलचे प्राचार्य अभय सोनटक्के सर यांनी अभिनंदन केले.

कबड्डी, खो-खो, क्रिकेट, व्हॅलीबाल इत्यादी मैदानी स्पर्धेत विजयी संपादन करणारे महिला खेळाडू सोलवणे सोनाली, गायकवाड मोहिनी, स्वामी शितल, आरकस प्रतिक्षा, परिचारक निशा, गिरी प्रणिता, प्रियांका म्हमाणे, ऐश्वर्या बागल, पाटोळे पुष्पा, पवार मीनाक्षी, चव्हाण सुजाता,
सोनवणे दीक्षा, शिंदे अंजली, निरगुडे कीर्ती, कांबळे प्रतिभा, मुंगळे ऋतुजा, बिराजदार प्रियंका, जरे शीतल तसेच मुलांमध्ये कबड्डी, खो-खो, मैदानी, स्पर्धेमध्ये विजय संपादन करणारे खेळाडू गणेश शिंदे, मोहम्मद शेख, विक्रमसिंह वागज, सुरज फाटे, श्रीशैल नागशेट्टी, लक्ष्मण तरडे, तुकाराम
बोधले, राजकुमार पाटील, नालसाब पठाण, ज्ञानेश्वर कारंडे, अभिषेक माने, महेश घायतिडक, ज्ञानदीप बिराजदार, शुभम बोबडे, ऋषिकेश गायकवाड, अमीर फकीर, दीपक मडके, भांगे सौरभ, शुभम लोंढे, प्रशांत शेवाळकर, आकाश आरकिले व गायन विभागा मध्ये आकाश शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला.

या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गणेश बागल, प्रा. दीपक भोसले सर यांचे मार्गदर्शन लाभले.

add