लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 11 March 2020

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा


पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर)  येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला.
        पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर, ॲड.मनाली कुलकर्णी, ॲड. वनिता गिराम आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे खजिनदार दादासाहेब रोंगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थीनी सई शिंदे आणि शिक्षक गोपाळ माळी यानी "ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली तो जिजाऊचा ‘शिवबा’ झाला" "ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला, ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली ती राधेचा ‘श्याम’ झाला, ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली, तो सीतेचा ‘राम’ झाला. त्यामुळे प्रत्येक महान व्यक्तिच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून ‘स्त्री शक्तीला सलाम’ ही स्त्रीचे महत्व पटवून सांगणारी कविता सादर केली.

 यावेळी पूर्वा अवताडे, सायली बाभळे, अंकिता जाधवऋतुजा जाधव या विद्यार्थिनींनी भाषणे केली. प्रमुख पाहुण्या ॲड.विनया गिराम म्हणाल्या की, ‘आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट केले पाहिजे. यशाच्या उंच शिखरावर पोहचलेल्या महिलांचा सत्कार करताना आपण याचे भान ठेवले पाहिजे. ज्या महिलांना रोजच शेतशिवारात खूप काबाडकष्ट करून जगावे लागतेश्रम करावे लागतात, अशा महिलांचा सत्कार सन्मान करता आला पाहिजे.’ पो.नि.अवचर म्हणाले कि, ‘लहान लहान अन्यायाकडे दुर्लक्ष केले तर तेच पुढे मोठे अन्याय होऊ लागतात. त्यामुळे अन्याय सहन करू नका.’ असे सांगून त्यांनी अनेक गोष्टी आणि त्यांना आलेला अनुभव सांगून ‘महाराष्ट्र पोलीस तुमच्या सेवेसाठी २४ तास तत्पर आहेत.’ असे ते म्हणाले. ॲड.मनाली कुलकर्णी म्हणाल्या की, ‘महिला या अबला नसून सबला आहेत. त्यांच्यात खूप शक्ती आहे मात्र त्या शक्तीचा त्यांनी योग्य वापर केल्यास समाजात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी विकास कार्यात स्त्रियांची भूमिका महत्वाची ठरते.

 वडील, भावंडे, पती ही नाती महिलांच्या आयुष्यात महत्वाची असतात. त्या नात्यातील पुरुषांचे ऐकण्याची सवय आणि मानसिकता निर्माण करतात. ‘ऐकणेहे एका मर्यादित कक्षेत ठेवले तर महिलांच्या आत्मविकासाला योग्य आकार प्राप्त होईल.’ अध्यक्षीय भाषणात संस्थेचे खजिनदार दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘माँ साहेब जिजाऊ, क्रांतोज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने आजची स्त्री प्रेरित झाली आहे. मुलींनी यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची गरज आहे. यासाठी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले पाहिजे, त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने  सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष सार्थ ठरेल.’ या कार्यक्रमावेळी संस्थेचे सचिव डॉ.बी.पी. रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम.बागल यांनी सर्व महिला शिक्षिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व विद्यार्थीशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण यांनी मानले.a

add