पंढरीत महिला दिनानिमित्त महिला सरपंचांचा विशेष सन्मान... राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी चॅरीटेबल ट्रस्ट व पंढरपूर Live सोशल फाऊंडेशन चे आयोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

पंढरीत महिला दिनानिमित्त महिला सरपंचांचा विशेष सन्मान... राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी चॅरीटेबल ट्रस्ट व पंढरपूर Live सोशल फाऊंडेशन चे आयोजन

पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 8 मार्च 2020 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त पंढरीत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला भगिणींचा सन्मान करण्यात आला.  हा ‘महिला गुणगौरव सोहळा शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड पंढरपूर येथे संपन्न झाला. राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी ट्रस्ट व पंढरपूर सोशल फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने या अनोख्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ नगरसेविका रेहानाताई बोहरी, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्या नगरसेविका शकुंतलाताई नडगिरे, नगरसेविका सौ. भाग्यश्रीताई शिंदे, नगरसेविका सौ. रेणुकाताई घोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव सौ. आरती ओंकार बसवंती यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या समारंभामध्ये अनेक महिला सरपंचासह सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय कार्य केलेल्या अनेक महिलांचाही सन्मान करण्यात आला. राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष ओंकार बसवंती, पंढरपूर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान वानखेडे, सचिव विजयकुमार गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ माँसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ.आरती ओंकार बसवंती व सौ.अंजली भगवान वानखेडे यांचे हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी 70 वर्षीय जेष्ठ महिला सरपंच यशोदा रामा आयरे (सरपंच खरातवाडी) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यानंतर पंढरपूर तालुक्यातील ग्रा.पं. सरपंच नुतन उध्दव रसाळे (सरपंच लक्ष्मी टाकळी), शामल औदुंबर पाटील (सरपंच सोनके), स्वाती संजय नागणे (सरपंच कोंढारकी), सोनाली दादासो साखरे (सरपंच उजनी वसाहत पट.कुरोली), सविता दत्तात्रय चव्हाण (सरपंच आढीव), कविता हणुमंत कोळी (सरपंच गादेगाव), मथुराबाई अर्जुन मदने (सरपंच वाखरी), स्मिता राजेश पाटील (सरपंच कान्हापुरी) या महिला सरपंचांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व गुलाबपुष्प देवुन सन्मानीत करण्यात आले. वाखरी च्या ग्रा.पं. सदस्या सौ.राजश्री लोंढे व खेड भोसे च्या पोलीस पाटील सौ. नंदिनी विष्णु गवळी, समाजसेविका मंदोदरी भारत मुळे, धनश्री संतोष जवंजाळ, मंजुळा आनंद धोंडभुसे, राबिया टिनमेकर, उल्का विष्णु लटके, रेखाताई कुलकर्णी, प्रिया मिसाळ, लक्ष्मी ढोणे, सारिका पवार, सुरेखा पवार, पुनम भिसे यांचाही यावेळी सन्मानपत्र व गुलाबपुष्प देवुन सन्मान करण्यात आला.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले म्हणाल्या की, आज राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी चॅरीटेबल ट्रस्ट व पंढरपूर सोशल फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या या अनोख्या समारंभाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आम्हा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांना या समारंभामुळे कार्य करण्यासाठी नवी प्रेरणा व उर्जा मिळाली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महिला सरपंचांचा होणारा अशा प्रकारचा हा सन्मान निश्‍चितच गौरवास्पद आहे. यावेळी सोनके ग्रा.पं. सरपंच शामलताई पाटील, मंदिर समिती सदस्या शकुंतलाताई नडगिरे, वाखरी ग्रा.पं. सदस्या राजश्रीताई लोंढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.सिध्दी मंदार केसकर यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान वानखेडे यांनी केले. कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश सांगताना राजवीर राजलक्ष्मी बहुउद्देशीय समाजसेवी चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव सौ. आरती ओंकार बसवंती म्हणाल्या की, ‘‘ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच, महिला सदस्या, महिला पोलीस पाटील यांनी स्वत: आपले काम गसेविका, नगराध्यक्षा, ग्रामपंचायत सदस्या, सरपंच, पोलिस पाटील आदी राजकीय पदावर विराजमान झालेल्या महिला भगिणींना मिळालेल्या पदावर काम करताना संपुर्ण हक्क मिळायला हवा. ग्रामपंचायत असो वा नगरपरिषद आपण सार्‍यांनी फक्त सार्वजनिक सभा व कांही मिटींग याव्यतिरिक्तही नियमितपणे आपल्या कामकाजाकडे वैयक्तीक लक्ष द्यायला हवं. महिलांना राजकारणात आरक्षण देण्यामागचा एकच उद्देश होता तो म्हणजे ‘महिला सबलीकरण’ निवडून आलेल्या महिला भगिणींनी आपल्या पतीवर विसंबुन न राहता कांही निर्णय स्वत: सुध्दा घ्यायला हवेत. आपले कामकाज आपण स्वत:च करायला हवे.’’  असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाची अध्यक्षीय सुचना ओंकार बसवंती यांनी केली तर अनुमोदन विजयकुमार गायकवाड यांनी दिले. आभार सौ.आरतीताई बसवंती यांनी  मानले.

add