गादेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न... गादेगाव ग्रामपंचायत व पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 16 March 2020

गादेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न... गादेगाव ग्रामपंचायत व पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन

गादेगाव ग्रामपंचायत व पंढरपूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संयुक्त विद्यमाने गादेगाव (तालुका पंढरपूर) येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटक सौ सुनंदाताई राजेंद्र पवार (विश्वस्त अग्रिकल्चरल ट्रस्ट बारामती) यांच्या हस्ते संपन्न झाले. 

अध्यक्षस्थानी सौ. राजश्री राजन पाटील या होत्या.यावेळी बोलताना त्यांनी महिला सक्षमीकरण व स्वच्छतचे महत्व पटवुन दिले. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला बचत गट व व्यवसायिक मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सौ.सुनंदाताई पवार यांनी किशोरवयीन मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना करणेसंदर्भात अधिक माहिती दिली. मुलींना ‘गुड टच व बॅड टच’ याची चित्रफित स्क्रीनवर  दाखवून मार्गदर्शन केले. बचत गटातील महिला प्रशिक्षण व अर्थसहाय्या  विषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

 यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.सविताताई  व्होरा यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले यावेळी  सौ.प्रफुलताताई राजाबापू पाटील, सौ. प्रणितीताई भालके, सौ मंजुश्रीताई सुधीर भोसले, गादेगाव च्या सरपंच सौ. कविताताई कोळी आदींसह अनेक महिला भगिणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. अनिताताई राजेंद्र पवार, युवती जिल्हा उपाध्यक्षा चारुशीलाताई कुलकर्णी, तालुका उपाध्यक्षा  संगीताताई पाटील व सुवर्णा ताई चव्हाण यांनी केले होते.

add