डेथ वॉरंट जारी... निर्भया च्या दोषींना उद्या फाशी देण्याचे निश्चित - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 2 March 2020

डेथ वॉरंट जारी... निर्भया च्या दोषींना उद्या फाशी देण्याचे निश्चित

Pandharpur Live Online - 
पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. या चौघाही आरोपींना उद्या सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे.  निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात यावी अशी विनंती त्यानं या याचिकेतून कोर्टाकडे केली होती.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सर्वसंमंतीने पवनची याचिका फेटाळली. त्याचबरोबर उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिल्याची माहिती आहे.

क्युरेटिव्ह याचिकेची सुनावणी ही बंद खोलीमध्ये केली जाते, त्यानुसार ही सुनावणी देखील बंद खोलीत पार पडली. यापूर्वी उर्वरित तीन दोषींची क्युरेटिव्ह याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे.

दरम्यान, कनिष्ठ कोर्टाने 17 फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करीत 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशीची तारिख निश्चित केल्याची माहिती आहे.

निर्भया प्रकरण
दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी 23 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. संबंधित तरुणीवर सिंगापूरमध्ये उपचार करण्यात आले. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या प्रकरणात विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह यांच्यासह अल्पवयीन मुलगा दोषी ठरला. त्याला तीन वर्षांच्या शिक्षेनंतर सोडून देण्यात आले. तर इतर चौघांविरुद्ध खटला चालवण्यात आला. त्यात चौघा दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर चौघांनीही वेगवेगळ्या कायदेशीर मार्गांनी फाशी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. आता दिल्ली कोर्टाने त्या चौघांविरुद्ध फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट जारी केले आहे. सुप्रीम कोर्टानेही या फाशीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. आज पटियाला हाऊस कोर्टानंही तसाच निर्णय दिल्यामुळं उद्या या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे.

add