मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी परमवीर सिंह यांची नियुक्ती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 1 March 2020

मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी परमवीर सिंह यांची नियुक्ती

Pandharpur Live Online-
मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी परमवीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1988 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी या आधी ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. मावळते पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. त्यांनी मुंबई पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट दिली होती. त्यांनी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचे एसपी म्हणूनही काम पाहिले आहे. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. महाराष्ट्र विधी व सुव्यवस्थेचे अतिरिक्त डीजीपी म्हणून काम पाहिले आहे.

परमवीर सिंह हे सध्या राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून काम पहात होते. त्यांच्या जागी लाचलूचपत विभागाचे नवीन महासंचालक म्हणून अतिरीक्त पोलिस महासंचालक बिपीन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात परमवीर सिंह यांनी विदर्भातील 12 पाटबंधारे प्रकल्पांतील घोटाळ्याच्या आरोपातून अजित पवार यांना क्‍लीन चीट दिली होती.

त्यांनी या आधी पोलिस दलात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

add