चंदन चोराच्या मुसक्या वनविभागाने आवळल्या चंदन चोरीचे मध्यप्रदेश कनेक्शन उघड - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 5 March 2020

चंदन चोराच्या मुसक्या वनविभागाने आवळल्या चंदन चोरीचे मध्यप्रदेश कनेक्शन उघड

Pandharpur Live-
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपुर शिवारात चोरी झालेल्या चंदन चोरीचे थेट कनेक्शन मध्यप्रदेशात जात असल्याचे उघड झाले आहे. येथील वन विभागाच्या पथकाने मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे चंदन ऑइल च्या फॅक्टरीवर छापा टाकून तीन लाखाचे चंदन पावडर हस्तगत केली आहे.या प्रकरणी सहाजनाना ताब्यात घेण्यात आले असून अन्य तीघे फरार आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर परिसरात चंदन चोरीचा प्रकार घडल्यानंतर वन विभागाने 26 फेब्रुवारी 2020 रोजी सिताराम गणेश कसबे, शिवराम दत्तात्रय सुरवसे, सुनील कोंडीराम साळवे, दिगंबर आबा गायकवाड, गजानन भास्कर लांडगे (रा.सर्व तांदुळजा ता. जि. लातूर) या पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. यात पकडलेल्या आरोपीकडून तपासात अमर बलभीम हुलगुंडे याला अटक करण्यात आली. या सहाजणांची तपासणी केली असता या टोळीचा मुख्य सूत्रधार हनुमंत घुगे (रा. होळ ता. केज) हा असल्याचे समजते तर अमर रोहिदास नरसिंगे व अनिल पाटोळे ( रा. तांदूळजा, ता.जि. लातूर) यांची नावे तपासात पुढे आली आहेत. हे तिघेही अद्याप फरार आहेत. पकडलेल्या आरोपीकडून या टोळीचे कनेक्शन मध्यप्रदेशात असल्याचे उघड झाले आहे. वनविभागातील चंदनाची चोरी करून ते चंदन मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथील एनटी इशेंशीएल ऑईल्स या कंपनीकडे विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अंबाजोगाईच्या वन विभागाच्या पथकाने या ऑईल कंपनीत छापा टाकून 147 किलो अवैद्य चंदनाची तीन लाख रुपये किंमतीची पावडर हस्तगत केली आहे.
वनविभागाने केलेल्या परराज्यातील कारवाईत परळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. शिंदे, एम. एस. मुंडे. वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवडे, जी.बी. कस्तुरे वनमजूर एस. डी. पारवे, डी. एन.गित्ते, एम एम तपसे यांचा समावेश आहे.

आरोपींना बुधवारपर्यत कोठडी
पकडलेल्या सहा आरोपींना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

add