अभिनेते अमजद खान यांचे बंधु अभिनेते इम्तियाज खान यांचे निधन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 March 2020

अभिनेते अमजद खान यांचे बंधु अभिनेते इम्तियाज खान यांचे निधन


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- अभिनेते अमजद खान यांचे बंधु, अभिनेते इम्तियाज खान यांचे हार्ट ॲटॅकने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

इम्तियाज यांना आपल्या मोठ्या भावाप्रमाणे (अमजद) फार प्रसिध्दी मिळाली नाही. परंतु, त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. यामध्ये यादों की बारात, धर्मात्मा, दयावान, बंटी और बबली या चित्रपटांचा समावेश आहे.

टीव्ही अभिनेत्री कृतिका देसाई यांचे ते पती होते. त्यांना दोन मुली आहेत. अभिनेत्री अंजु महेंद्रु या इम्तियाज यांच्या खूप चांगली मैत्रीण होती. सर्वात आधी त्यांनीच निधनाची बातमी देत त्यांचा जुना फॅमिली फोटो शेअर केला होता.

add