श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विविध मागण्यांसाठी रोंगे सरांचे सहकार्‍यांसह लाक्षणिक उपोषण - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 9 March 2020

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विविध मागण्यांसाठी रोंगे सरांचे सहकार्‍यांसह लाक्षणिक उपोषण


 

पंढरपूर- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे (ता. पंढरपूर) या कारखान्याशी संबधितांना न्याय मिळण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर डॉ.बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.  यामध्ये डॉ. बी. पी. रोंगे व सहकारी यांनी श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद या नात्याने सभासद, कामगार व ऊस वाहतुकदार यांच्यावर झालेल्या व होत असलेल्या अन्यायाच्या अनुषंगाने अन्याय दूर व्हावा यासाठी व कारखान्याच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी आज दि. ०९  मार्च रोजी विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

 या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी सभासदांची राहिलेली एफआरपीची रक्कम त्वरित मिळण्याची व्यवस्था व्हावी, कामगारांचा गेल्या १० ते ११ महिन्याचा थकीत पगार व त्यांची व निवृत्त कामगारांची सर्व प्रकराची देणी त्वरित मिळण्याची व्यवस्था व्हावी, ऊस वाहतूकदारांची सर्व प्रकराची थकीत रक्कम त्वरित मिळण्याची व्यवस्था व्हावी,कारखान्याने दाखवलेल्या साखरेचा शिल्लक स्टॉक व जाग्यावरची वस्तुस्थिती याची आपल्या तर्फे समिती नेमून त्यात आमच्या एका प्रतिनिधीचा समावेश करून त्वरित इन कॅमेरा पडताळणी करण्याची व्यवस्था व्हावी,सोलापूर जिल्हातील व महाराष्ट्रातील एके काळचा वैभवशाली कारखाना स्थापनेपासुनच्या गेल्या चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच बंद ठेवल्याबद्दल चेअरमन साहेबांना राजीनामा देण्याचे आदेश द्यावेत व त्यांच्या कारभाराची सक्षम यंत्रणेद्वारे चौकशी करण्यात यावी,श्री विठ्ठल सर्व सेवा संघामार्फत झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी,कारखाना स्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज, कै. यशवंतरावजी चव्हाणसाहेब व संस्थापक कै. औदुंबरआण्णा पाटील यांच्या पुतळ्याची योग्य ती निगा घेण्याबाबत संबधितांना आदेश द्यावेत,तरी आपणास या निवेदनाद्वारे नम्र विनंती करण्यात येते कि, आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही व कारवाई त्वरित सुरु करावी.आम्हास न्याय नाही मिळाला तर लोकशाही मार्गाने आमच्या आंदोलनाची तिव्रता वाढवावी लागेल व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनावर राहील अशी विनंती केली आहे. यावेळी सायंकाळी पंढरपूरच्या तहसीलदार डॉ.वैशाली वाघमारे ह्या प्रत्यक्ष उपोषणाच्या ठिकाणी आल्या आणि निवेदन स्वीकारले. 

त्यानंतर तहसीलदार डॉ.वाघमारे यांच्या हस्ते डॉ. बी.पी.रोंगे यांना शरबत देऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता करण्यात आली.या निवेदनावर माजी संचालक शेखर भोसलेपांडुरंग नाईकनवरे, काशिनाथ लवटे, नारायण मेटकरी, शांतिनाथ बागल, कुमार शिंदे, संभाजी शिंदे, गोरख पाटील, पंजाबराव भोसले,बळीराम गायकवाड, सतीश लवटे, पोपट पाटील, बाळासाहेब पवार, मोहन होळनवरे, सिताराम गायकवाड, बालाजी भोसले, सुभाष होळकर, पांडुरंग देशमुख, दीपक भोसले, राजेंद्र बागल, गजानन हरिदास, आदींच्या सह्या आहेत. तर उपोषणाच्या ठिकाणी सकाळपासून विठ्ठल कारखान्याच्या नेतृत्वावर नाराज असलेली मंडळी प्रत्यक्ष भेटून संतप्त प्रतिक्रिया देवून लाक्षणिक उपोषणाला पाठींबा देत होते. यामध्ये संस्थापक संचालक अॅड. विश्वंभर चव्हाण, माजी संचालक प्रकाश (आप्पा) पाटील, बळीराजा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक भोसले, अंकुश शेंबडे, अंकुश जमदाडे, डॉ. वृषाली पाटील, भाऊसाहेब पवार, रामचंद्र ढोबळे, पांडुरंग कांबळे दिलीप भोसले हनुमंत नागणे, पांडुरंग कौलगे, राजेंद्र बागल, बालाजी जाधव, बाळासाहेब रोंगे, युवराज देशमुख, शुभम गुळवे, औदुंबर निकम, गुंडू पाटील, पवन चौगुले, समाधान रोंगे, अशोक भोसले यांच्या सह शेकडोंचा समावेश होता.  

add