पंढरीतील जुनी पेठेत सकारात्मक बदलास प्रारंभ.... पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 6 March 2020

पंढरीतील जुनी पेठेत सकारात्मक बदलास प्रारंभ.... पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

PANDHARPUR LIVE-
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरीतील जुनी पेठ परिसरात सकारात्मक बदल होण्यास प्रारंभ झाला आहे. पंढरपूरमधील पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने हा बदल घडुन येत असल्याचे दिसुन आले. जुनी पेठ येथे पाणपोई व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. पाणपोईचे उद्घाटन कोळी महासंघाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव यांचे शुभहस्ते तर  वाचनालयाचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीरभाऊ अभंगराव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सुरेखाताई माने, पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निलेश माने, महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, पोपट सावतराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त जुनी पेठ येथे काळाची गरज ओळखुन पाणपोई व वाचनालय सुरु केले आहे. येथे आलेल्या भाविक भक्तांना स्वच्छ व थंडगार पिण्याचे पाणी मिळावे व स्थानिकांसह वारकरी भाविकांना व तरुणांना वाचनासाठी वाचनालय सुरु केले आहे. जुनी पेठ म्हणजे पुर्वीच्या काळातलं पंढरीचं वैभव होतं. याठिकाणची व्यापारपेठ कायम गजबजलेली असायची. परंतु काळाच्या ओघात ‘जुनी पेठ’ फक्त नावाला शिल्लक राहिली. याच जुनी पेठेत कांही सकारात्मक बदल होणे आवश्यक वाटत आहे. सुरुवात आम्ही आमच्यापासुन करत आहोत. या भागातील तरुणांच्या मनात सकारात्मक विचार निर्माण व्हावेत, येथील भावी पिढी सुशिक्षीत आणि सुसंस्कारीत घडावी या उद्देशाने वाचनालयाची सुरुवात केली आहे. आमची जुनी पेठ पुर्वीप्रमाणेच चांगल्या नावाने ओळखली जावी. अशी इच्छा आहे. असे मत यावेळी बोलताना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी व्यक्त केले. 

 पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनची स्थापना होवुन एक वर्ष झाले. या कालावधीत फाऊंडेशनच्या माध्यमातुन विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. प्रामुख्याने पंढरीत येणार्‍या वारकरी भाविकांना केंद्रबिंदु मानुन फराळ वाटप, चहा वाटप, आरोग्य सुविधा व वेळप्रसंगी तातडीची सुविधा पुरवण्यात आल्या. निराधार महिला भगिणींच्या हस्ते फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी राखी बांधुन घेत रक्षाबंधनाचा अनोख्या पध्दतीचा सण साजरा करत अनेक भगिणींना आधार व आवश्यक ती मदत देण्याचं कार्य केलं. नववर्षानिमित्त वृध्दाश्रमातील आजी-आजोबाच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. अंधशाळेमध्ये तीळ-गुळ वाटपचा कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमामध्ये अंध असुनही डोळस माणसांच्या डोळ्यात अंजन घालतील असं उत्कृष्ट कार्य अंध व्यक्ती करु शकतात याचं दर्शन घडवलं. अंध विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करत प्रोत्साहनपर उपक्रम राबवले. कै. पांडुरंग (तात्या) माने यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त पंढरपूरमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेतली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा, नाथ चौक, जयभवानी चौक, जुनी पेठ चौक ते फाऊंडेशचे कार्यालय अशा पध्दतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  

पाणपोई व वाचनालय उद्घाटन कार्यक्रमास गणेश माने, संजय घोडके, दिनेश माने, शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे-नाईक, ॠषीकेश बडवे, मधुकर फलटणकर, जालिंदर करकमकर, संपत सर्जे, रामभाऊ कोळी, उमेश जाधव, बालाजी कोळी, संजय पगारे, अक्षय म्हेत्रे, अर्जुन देवकुळे, सुरज कांबळे, दावल शेख, राजेंद्र म्हेत्रे, सोहम साळुंखे, महेश माने आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

add