पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा

जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे पंढरपुर शहर व तालुक्यातील केमिस्ट महिला भगिनींचा सत्कार केमीस्ट भवन येथे करण्यात आला. यावेळी महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी उपस्थित महिलांना डॉक्टर ऋतुजा  गोळवलकर उत्पात, डॉ आशीष चव्हाण यांनी आरोग्य विषयी समस्या व त्यावरील उपायां संदर्भात मार्गदर्शन केले तसेच  प्रा. प्राजक्ता मोरे , अमृता सादिगले, या प्रमुख उपस्थित होत्या यावेळी सौ दिपाली कारंडे ,सौ माधुरी जाधव सौ प्रियंका आंबरे ,सौ करचे, या होलसेल व्यवसाय करणारा महिलांच्या सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व केमिस्ट महिलांचा फेटे बांधून यथोचित सन्मान  करण्यात आला.

यावेळी केमिस्ट असोसिएशनचे महिला पदाधिकारी सौ अमृता माने ,प्रियांका गुठाळ व केमिस्ट  महिला   मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन सौ श्रद्धा कुलकर्णी यांनी केले

add