पंढरपूर नगरपरिषदेमार्फत प्लॅस्टीक जप्तीची धडक मोहिम... शहरातील २ प्लॅस्टिक विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 11 March 2020

पंढरपूर नगरपरिषदेमार्फत प्लॅस्टीक जप्तीची धडक मोहिम... शहरातील २ प्लॅस्टिक विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई

महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकॉल अविघटनशिल वस्तुचे (उत्पादन वापर वाहतुक हाताळणी साठवणुक) अधिसुचना २०१८ अन्वये पंढरपूर नगरपरिषदेचे मार्फत शहरातील सिगलयुज प्लॅस्टिक (प्लॅस्टिक कँरीबँग) साठा केल्या प्रकरणी मुनाफ बागवान,बाळकृष्ण नावरकर या दोन विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करून १५००० इतका दंड करून २०० किलो प्लॉस्टीक कँरीबँग जप्त करण्यात आल्या सदर प्लँस्टिक जातीची धडक मोहिम पंढरपूर नगरपरिषदेचे मा मुख्याधिकारी श्री अनिकेत मानोरकर यांचे आदेशान्वये उपमुख्याधिकारी श्री सुनिल वाळुजकर आरोग्याधिकारी डॉ संग्राम गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे आरोग्य निरिक्षक श्री शरद वाघमारे श्री नागनाथ तोडकर यांनी केली या वेळी या पथकामध्ये आरोग्य विभागाकडील कर्मचारी दत्ता चंदनशिवे, अनिल गोयल, राम खरात , वैभव दंदाडे , दिलीप पारखे, रमेश पवार ,रवि पवार , उत्तम ढवळे आप्पा माने ,रवी ढवळे, हिम्मत गोयल, राजेंद्र वाघारे, नागेश लोखंडे बापु खिलारे अनिल कांबळे रजनीश गोयल लखन छापछडी मनोज मेहडा यांचा सहभाग होता.
      तसेच शहरात ही प्लँस्टिक शोध मोहिम वेळोवेळी राबविण्यात येणार असुन यापुढे ही सिंगल युज प्लँस्टिक (प्लँस्टिक कँरिबँग) आढल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्तीची कारवाई करण्यात येईल त्यामुळे शहरातील नागरिक व व्यापा-यांनी हातगाडीवाले व किरकोळ फिरते विक्रेत्यांनी सिंगलयुज प्लँस्टिकच्या कँरिबँगचा  वापर करू नये असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीन करण्यात आले.

add