पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आधुनिक नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जयंती साजरी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 12 March 2020

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आधुनिक नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जयंती साजरी


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आधुनिक नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे दिवंगत माजी उपपंतप्रधान, माजी संरक्षणमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष तसेच पक्षनेते अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली,  उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, सार्व.बांधकाम बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरसेवक डी.राज.सर्वगोड, इरफान मुजावर, माजी नगरसेवक मेजर मोहन पवार, सिद्धेश्वर गरड, आण्णा धोत्रे तसेच नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

add