आधीच व्यवसाय थंडावलेत...त्यात मार्च एंड; पंढरपूर नगरपरिषदेने सक्तीची करवसुली त्वरीत थांबवावी... शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 19 March 2020

आधीच व्यवसाय थंडावलेत...त्यात मार्च एंड; पंढरपूर नगरपरिषदेने सक्तीची करवसुली त्वरीत थांबवावी... शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी!


             पंढरपूर लाईव्ह- कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर पंढरीतील उद्योग-व्यवसाय थंडावलेले आहेत, त्यातच मार्च एंड आहे... मंदीचे सावट गडद झालेले असतानाच पंढरपूर नगरपरिषदेने नागरिकांकडून सक्तीची करवसुली सुरु केलेली आहे; ही सक्तीची करवसुली तातडीने थांबवावी अशी मागणी पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांना देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले यांनी पंढरपूर लाईव्हला दिली.
                 कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे उद्योग धंद्यावर  मंदीचे सावट आणखी गडद झाले असून व्यवसाय पूर्णतः थंडावले आहेत. एकीकडे मार्च अखेर मुळे व्यापारी, उद्योजक आर्थिक अडचणीत असतानाच पंढरपूर नगर पालिकेने मात्र सक्तीने करवसुलीचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांममधुन तीव्र नाराजी व्यक्त होत असून नगर पालिकेने हि सक्तीची करवसुली तातडीने थांबवावी. अशी मागणी निवेदनात केलेली आहे. 
               याबाबत नगरपालिका प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहितीही श्री. भोसले यांनी दिलीय. निवेदन देताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, शहर उपाध्यक्ष सचिन कदम, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा माळी, नवनाथ मोरे आदी उपस्थित होते.

add