पंढरीची सुवर्णकन्या कु. रेवती सोनारची ' लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स ' मध्ये नोंद - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

पंढरीची सुवर्णकन्या कु. रेवती सोनारची ' लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स ' मध्ये नोंद

 

“क. भा. पा. महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींची राष्ट्रीय विक्रमास गवसणी ” 
“ जगातील सगळ्यात मोठे  डेस्क कॅलेंडर पंढरी नगरीत .” 
पंढरपूर (प्रतिनिधी) :- येथील श्री. व सौ. सविता रवि सोनार या दाम्पत्यांची सुवर्णकन्या व क. भा. पा. महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असणाऱ्या  कु. रेवती रवि सोनार हिला तिच्या अठराव्या वाढदिवसाच्या औचित्याने तिचा भाऊ चि. ओंकार रवि सोनार याच्याकडून भेट म्हणून देण्यात आलेले डेस्क कॅलेंडर हे सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर (Biggest Desk Calendar) असल्याचे '  लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स ' च्या वतीने सुवर्णकन्या कु. रेवती रवि सोनार हिला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.
          सात फूट उंच आणि दहा फूट रुंद या आकारात असलेले एकूण सत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे कॅलेंडर सात पृष्ठांचे असून पहिल्या पृष्ठावर वर्षभरातील बारा महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. तर उर्वरित सहा पृष्ठांवर प्रत्येकी दोन महिन्यांचे दिनांक व वार दिलेले आहेत. शिवाय  त्या सहा पृष्ठांवर सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार  यांचे  ' बहिण ' या विषयावरील  सुविचार  आहेत.
          एका लोखंडी फ्रेमवर हे भव्य-दिव्य डेस्क कॅलेंडर असून सर्व पृष्ठे महिन्या नुसार बदलणे शक्य आहेत. कु. रेवती सोनार हिच्याकडे असणाऱ्या या भव्य-दिव्य डेस्क कॅलेंडर मुळे सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर असे प्रमाणित करताना ' लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ' ने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.
          यापूर्वी '  इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ' मध्ये नोंद झालेल्या या डेस्क कॅलेंडरचे जगातील सर्वात मोठे डेस्क कॅलेंडर म्हणून  ' गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ' या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेकॉर्ड बुक मध्येही नोंद व्हावी म्हणून सुवर्णकन्या कु. रेवती सोनार प्रयत्नशील आहे. पंढरपूर येथील प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात प्राथमिक शिक्षण, द. ह. कवठेकर विद्यालय येथे माध्यमिक शिक्षण, उमा महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या व क. भा. पा. महाविद्यालय येथे पदवी शिक्षण घेत असलेल्या कु. रेवती सोनार हिला वाढदिवसाची भेट म्हणून मिळालेल्या या भव्य-दिव्य डेस्क कॅलेंडर मुळे तिला मिळालेल्या बहुमानामुळे पंढरपूर शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

add