पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 10 March 2020

पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न


पंढरपूर: प्रतिनिधी- कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
       या मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, पालक प्रतिनिधी प्रा. कुंभार, डाॅ. बागेश्री बोक्षे आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
       प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम प्रास्ताविक करताना म्हणाले, आपल्या पाल्यांची  झालेली प्रगती पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही पालक मेळाव्याचे आयोजन करीत असतो. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती खुप महत्वाची असुन विद्यार्थ्यांच्या गैरहजरीत जे शिक्षण दिले गेले ते शिक्षण गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना समजत नाही म्हणून प्रत्येक तासाची उपस्थित महत्वाची आहे. प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी सिंहगड महाविद्यालयातील शिक्षक प्रयत्न प्रयत्न करत आहेत. याशिवाय आपल्या पाल्यांची हजेरी पालकांना संदेश द्वारे पाठवली जात असुन पाल्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी महाविद्यालयाला भेट देणं आवश्यक असल्याचे मत प्रा. अनिल निकम यांनी बोलताना व्यक्त केले.


       महाविद्यालयातील प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी इग्रंजी भाषेवर तुमचं प्रभुत्व असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी एकमेकांशी अथवा सोशल मिडिया संवाद साधत असताना इग्रंजी भाषेतून संवाद साधला तर तुमच्या इंग्रजी भाषेत सुधारणा होईल. नामांकित कंपनीत प्लेसमेन्ट होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच वैयक्तिक गुण विद्यार्थ्यांकडे असतील तर विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनी निवड होते. असे मत प्रा. कटेकर यांनी बोलताना व्यक्त केले.


         विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड, कौशल्य ओळखुन शिक्षण घेतले पाहिजे विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांची जेवढी जबाबदारी आहे तेवढेची जबाबदारी पालकांची सुद्धा आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. मुलांकडून चुका झाल्या तर पाठीशी न घालता त्या वेळीच सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना विश्वासात घेऊन समजून घ्यायला हवे असे मत अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे यांनी बोलताना व्यक्त केले.
        पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक वर्ग हा विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत असे मत पालक प्रतिनिधी डाॅ. बागेश्री बोक्षे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले आहे. या दरम्यान पालक प्रतिनिधी प्रा. कुंभार यांनी ही मनोगत व्यक्त केले.


              महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागाची शैक्षणिक गुणवत्ता ही प्रत्येक वर्षी वाढत आहेत. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहीले पाहिजे. महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणा-या विविध अॅक्टीव्हीटी, स्पर्धेत  सहभागी होणे महत्वाचे असुन यामधुनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
या पालक मेळाव्यात पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागातील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते प्रमाणपञ, पेन व गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आला.
   या मेळाव्याचे सुञसंचलन डीन ऑफ ट्रेनिंग ऑफिसर डाॅ. राजश्री बाडगे तर उपस्थितांचे आभार प्रा. शिवाजी पवार यांनी मानले.

add