रंगात दंग झाले पंढरपूरकर... प्रशासकीय अधिकारी व पंढरपूरकरांचा सहकुटूंब ‘अवघा रंग एक झाला’ - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 13 March 2020

रंगात दंग झाले पंढरपूरकर... प्रशासकीय अधिकारी व पंढरपूरकरांचा सहकुटूंब ‘अवघा रंग एक झाला’Pandharpur Live-  आज रंगपंचमी निमित्त पंढरीतील यमाई तलाव, तुळशी वृंदावन येथे तमाम पंढरपूरकरांसह प्रशासकीय अधिकारी सहकुटूंब रंगात दंग झाले. सर्वसामान्य पंढरपूरकरांसह प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींचा ‘अवघा रंग एक झाला’ असल्याचे आढळुन आले. प्रांताधिकारी सचिन ढोले, डीवायएसपी डॉ सागर कवडे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी प्रशासकीय अधिकारी या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी झाले होते.

येथील यमाई तलाव, तुळशी वृंदावन येथे श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे प्रांताधिकारी सचिन ढोले, डीवायएसपी डॉ सागर कवडे, नगराध्यक्षा साधना भोसले आदींच्या हस्ते नैसर्गिक रंगांची उधळून करुन पूजन करण्यात आले

पंढरपूरकरांनी आज सप्तरंगाची उधळण करीत रंगपंचमी सण जल्लोषात साजरा केला

पंढरीचा पांडुरंग हा श्रीकृष्णाचा अवतार असल्याने पंढरीतील रंगपंचमीला आगळेवेगळे महत्व आहे पण कोरोना दहशतीमुळे रंगपंचमी करायची की नाही याबाबत देशभरात उलटसुलट चर्चा रंगली मात्र पंढरपूरकरांनी कोरोनाची भीती न बाळगता रंगपंचमी बिनधास्तपणे खेळली.

यावेळी डीजेच्या तालावर उपस्थित तरुणाईने एकच जल्लोष केला नगराध्यक्षा साधना भोसले यांना देखील डिजेवर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही 

हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी यमाई तलाव वोकिंग ग्रूपचे राजू कपडेकर, पांडुरंग घंटी, राजू उराडे, बाबू मोरे, रवी भिंगे, सुनील येळे, महेश उंबरे, गोटू जोशी, सुहास ईचगावकर, अभय जोशी, महेश खिस्ते, संजय कौलगी आदींनी परिश्रम घेतले.

add