परळी - मांडेखेल येथे वीज पडुन एक ठार;पाच जखमी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 19 March 2020

परळी - मांडेखेल येथे वीज पडुन एक ठार;पाच जखमी


             परळी (प्रतिनिधी)- परळी तालुक्यातील मांडेखेल येथे शेतात ज्वारी काढत असलेल्या शतकर्याच्या कुटुंबावर वीज कोसळल्याने शेतकरी सुधाकर आश्रोबा नागरगोजे हे जागीच ठार झाले तर चार महिलासह 16 वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना आज दि.18 रोजी दुपारी चार च्या सुमारास घडली.
              परळी तालुक्यात सध्या ज्वारी,हरभरा काढणीची शेतकर्यामध्ये लगबग असुन मागील तीन-चार दिवसापासुन ढगाळ वातावरण असल्याने मांडेखेल येथील शेतकरी सुधाकर आश्रोबा नागरगोजे वय 38 वर्षे हे आपल्या शिवणी बबिता मनोहर नागरगोजे,कस्तुराबाई रमेश व्हावळे,सागरबाई आप्पाराव व्हावळे,सीताबाई अंगद नागरगोजे,मंगल मधुकर नागरगोजे,अनुसयाबाई विठ्ठल नागरगोजे  महिलांसह ज्वारीच्या कणीसांची खुडणी करत होते तर पुतण्या नागनाथ अंगद नागरगोजे वय 16 वर्षे हा इयत्ता दहावीची परीक्षा देवुन शेतात ज्वारी खाढणीसाठी आला होता.दुपारी साडेचार च्या सुमारास वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली.
               यात पावसात वीज कोसळली यात सुधाकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा दहा वर्षीय पुतण्या गंभीर जखमी झाला.सुधाकर यांना परळी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठीआणण्यात आला आहे.या घटनेमध्ये पुतण्या नागनाथ व इतर चार महिला जखमी झाल्या आहेत.बाजार समितीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे,तहसिलदार विपीन पाटिल यांनी उपजिल्हा रुग्णालयात नागरगोजे यांच्या नातेवाईकांची भेट घेवुन घटनेची माहिती घेतली.

add