परळीत कर्णबधिरांच्या शिबीरात 1842 रुग्णांची तपासणी ; मार्च अखेर 585 मोफत डिजिटल श्रवणयंत्रण मशिनचे होणार वाटप - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 7 March 2020

परळीत कर्णबधिरांच्या शिबीरात 1842 रुग्णांची तपासणी ; मार्च अखेर 585 मोफत डिजिटल श्रवणयंत्रण मशिनचे होणार वाटपधनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उर्वरित गरजु रुग्णांना
 डिजिटल श्रवणयंत्र मशिनचे वाटप होणार-डॉ.संतोष मुंडे 
                 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी येथे 6 व 7 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटप पुर्वतासणी शिबीरास रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबीरामध्ये 1842 कर्णबधिर रुग्णांची तपासणी करण्यात आली. या सर्व रुग्णांना मार्चअखेर मोफत 25 हजार रुपये किंमतीचे श्रवणयंत्र 585 मशिन मोफत वाटप करण्यात येणर आहेत. तर उर्वरित राहिलेल्या सर्व रुग्णांना सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मशिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे. 
               परळी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातुन 25 हजार रुपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र वाटपासाठी पुर्वतपासणी शिबिरात  रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी रूग्णांची प्रचंड गर्दी होती. या पुर्वतपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ. विजय कान्हेकर व डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोना व्हायरस टाळण्यासाठी हातात हात देऊ नका असे प्रतिपादन शल्यचिकित्सक  डॉ. अशोक थोरात यांनी केले. गरिबांच्या चेहऱ्यावर हसू दिसण्यासाठी अशा शिबीरांची गरज असल्याचे जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे तर तपासणी झालेल्या रुग्णांना मार्च अखेर मशीन मिळणार असे मत डॉ.विजय कान्हेकर यांनी परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत डिजिटल श्रवण यंत्र वाटप पूर्व तपासणी शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते .
                              या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, राष्ट्रीय डाँक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, परळी न.प.चे नगराध्यक्ष सौ.सरोजनीताई  सोमनाअप्पा हालगे, रा.काँ.चे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, रा.काँ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. एकनाथ मुंडे, पंचायत समितीचे सभापती बबनभाऊ गित्ते, उपसभापती बालाजी (पिंटू) मुंडे, डॉ. दे.घ.मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली गडदे, रा.काँ.चे उपाध्यक्ष सुरेश टाक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, प्रभारी अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉ. दिनेश कुरमे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. विनोद जगतकर, शहराध्यक्ष सय्यद सिराज, युवा नेते शंकर कापसे, युवा नेते माधव मुंडे, के.डी.उपाडे, वकील संघाचे अँड. मनजीत सुगरे, तालुकाध्यक्ष विद्यार्थी आघाडी जयदत्त नरवटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर होळंबे, पदमाकर शिंदे, बळीराम नागरगोजे, विठ्ठल साखरे,शंकर कोचे,  डॉ.अशोक मकर, डॉ.बालाजी फड, अॅड.अमोल सोळंके, डॉ.कसबे, महेश तिडके, कल्याण उदार, महादेव सोळंके, महेश मुंडे, निवृत्ती मुंडे, माऊली मुंडे, रणजीत रायभोळे, स्टारकीचे डॉ.पिलाई, राजेश लव्हारे, रामदास कराड, करण जायभाये व आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हाँस्पीटल, बस स्टँड- गार्डन रोड, परळी येथे हे शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जिल्हा आरोग्य विभाग, बीड, नाथ प्रतिष्ठान, परळी वैजनाथ, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना व स्टारकी फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून प्रत्येक व्यक्तीसाठी अंदाजे 25 हजार रूपये किंमतीच्या मोफत डिजिटल श्रवणयंत्र (कनाची मशीन) वाटपासाठी पुर्वितपासणी शिबीराचे आयोजन दि.06 व 07 मार्च रोजी करण्यात आले होते. 
                              या शिबिरात स्टारकी फाऊंडेशन अमेरिका  यांच्या तज्ञ टिम कडून शिबीरातील प्रत्येक व्यक्तीची पुर्ण तपासणी करण्यात आली. या शिबिरात पहिल्या टप्प्यात आठशे गरजुवंत कर्णबधिर रूग्णांना श्रवणयंत्र दिले जाणार आहे. या शिबिरात कमी ऐकू येणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीस तसेच ज्येष्ठ नागरिक व कर्णबधिर रूग्णांना 25 हजार रुपये किंमतीचे डिजिटल श्रवणयंत्र मोफत दिले जाणार आहे. या शिबीराच्या कार्यक्रमात पुढे बोलताना अजय मुंडे म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये या कार्यासाठी पाच टक्के निधी राखीव आहे .गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य असावे यासाठी असे भरवणे काळाची गरज आहे. यासाठी ना.धनंजय मुंडे व नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. विजय कानेकर बोलताना म्हणाले की ,या शिबिरामध्ये तपासणी झालेल्या रुग्णांना मार्च अखेर मशीनचे वाटप करण्यात येईल या शिबिराचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार व सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांना असल्याचे सांगून उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल शिबिराचे संपर्क प्रमुख डॉ. संतोष मुंडे यांचे त्यांनी अभिनंदन केले .याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी बाळासाहेब देशमुख डॉक्टर नरेंद्र काळे, प्रा.डॉ. विनोद जगतकर, सौ.सरोजनीताई हालगे आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रसताविक डॉ. संतोष मुंडे  यांनी केले.सूत्रसंचालन अभिमान मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीनिवास मुंडे यांनी केले.
                           दरम्यान आज दिनांक 6 व 7 मार्च रोजी झालेल्या कर्णबधिर रुग्णांच्या मोफत डिजिटल श्रावण यंत्र वाटप पूर्व तपासणी शिबिराचा परळी तालुका व परिसरातील सुमारे चारशे 1842 कर्णबधिर रूग्णांनी  लाभ घेतल्याचे सांगितले.  585 कर्णबधिर मोफत श्रवणयंत्राचे मार्च अखेर मोफत वाटप होणार असून उर्वरित ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कर्णबधिर गरजुवंत रूग्णांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिबीर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांनी दिली.

add