माजी मुख्यमंत्री म्हणतात... "माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला पगार जास्त आहे" - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 6 March 2020

माजी मुख्यमंत्री म्हणतात... "माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला पगार जास्त आहे"


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
'अर्थसंकल्प हा सर्व सामान्य माणसाला सहज शब्दात समजावा यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे हे पुस्तक अवघ्या 40 मिनिटामध्ये वाचता येईल. आपण जेव्हा घरचं बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. घरात बायकोचा पगार किती आपला किती पगार आहे, याच्यावर घरचं बजेट तयार करतो. माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो', अशी कबुली माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आपल्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अर्थसंकल्पात क्लिष्ट वाटणाऱ्या संज्ञा अतिशय सोप्या आहेत असं सांगताना त्यांनी आपल्या घरचं बजेट आणि राज्याचं बजेट यामध्ये जास्त फरक नसल्याचं त्यांनी सांगितलं

'हे पुस्तक सामान्य माणसाला बजेटमधील प्रत्येक गोष्ट सहजपणे कळली पाहिजे यासाठी हे आहे. आपण असं पुस्तक लिहिलं पाहिजे जे जास्तीत जास्त ४४ मिनिटात वाचता आलं पाहिजे अशी अट मीच ठेवली होती,' अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. बजेटसंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'जीडीपीचा नेमका अर्थ ५० टक्क्यांहून जास्त लोक सांगू शकत नाही. पण कार्यपद्धती आणि रचना कळली तर केंद्राचा किंवा राज्याचा असो अर्थसंकल्प समजू शकतो. त्याचं विश्लेषण करता येऊ शकतं'. हिंदी आणि इंग्रजीतही हे पुस्तक येणार असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

add