प्रा.विनया पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पी.एच. डी.पदवी प्रदान - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 16 March 2020

प्रा.विनया पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पी.एच. डी.पदवी प्रदान


पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील ‘कर्मवीर ग्रंथालया’च्या ग्रंथपाल श्रीमती विनया पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ‘ग्रंथालय व माहितीशास्त्र’ विषयाची पीएच. डी. पदवी प्रदान केली आहे. ‘Development of Human Resource in ICT Environment: An Analytical Study of College Libraries Affiliated to Solapur University, Solapur.’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. चा प्रबंध विद्यापीठास सादर केला. 

त्यांना या संशोधनासाठी  कलबुर्गी येथील गुलबर्गा विद्यापीठातील ग्रंथपाल डॉ. सुरेश जांगे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीमती विनया पाटील यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरम तथा महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन संजीव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, प्राचार्य जे. जी. जाधव, प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे, डॉ. राजेंद्र जाधव, प्राचार्य सुग्रीव गोरे, व राजूबापू पाटील यांनी अभिनंदन केले.


श्रीमती विनया पाटील यांनी बी.एस्सी.चे शिक्षण अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातून पूर्ण केले असून ‘बी.लिब अँड आयएससी’चे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या क.भा.पाटील महाविद्यालय या अभ्यासकेंद्रातून पूर्ण केले आहे. तसेच ‘एम. लिब. अँड आयएससी’ ची पदवी सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातून घेतली आहे. २००९ मध्ये त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यापूर्वी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमधून त्यांचे संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चासत्रांमधून संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांच्या या संशोधनासाठी प्रा. सदाशिव मोरे, राजू मोरे व अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले. डॉ. विनया पाटील यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व रयत हितचिंतकांकडून विशेष कौतुक होत आहे.    

add