अडचणीतूनही प्रगती साधली पाहिजे - मानव संसाधन व्यवस्थापिका स्वाती चाफळे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 10 March 2020

अडचणीतूनही प्रगती साधली पाहिजे - मानव संसाधन व्यवस्थापिका स्वाती चाफळे

स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा
पंढरपूरः-प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अनेक अडथळे येत असतात. त्या अडथळ्यांना आपण सामोरे जाऊन त्यांना दूर केले पाहिजे. आपल्याला मिळणाऱ्या विविध संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे व स्वतःची प्रगती साधली पाहिजे. माझ्याही जीवनात अनेक अडथळे आले परंतु स्वेरीने माझ्यात रुजवलेल्या गुणांच्या आधारे मी त्यांचा सामना करू शकले व स्वतःला सिद्ध करू शकले.’ असे प्रतिपादन पुण्यातील मास्टर केमिकल कार्पोरेशन, मास्टर सोल्युशनच्या मानव संसाधन व्यवस्थापिका व स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी स्वाती चाफळे यांनी व्यक्त केले.

        येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुटमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून स्वेरीतून २००८ साली उत्तीर्ण झालेल्या आणि पुण्यातील मास्टर केमिकल कार्पोरेशन, मास्टर सोल्युशनच्या मानव संसाधन व्यवस्थापिका म्हणून काम पाहत असलेल्या स्वाती चाफळे या उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून न्यू इंग्लिश स्कूल, मंगळवेढाच्या अध्यापिका प्रा. उज्वला पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे होते.

दिप प्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी प्रास्ताविकात स्वेरीच्या २००८ साली उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थिनी स्वाती चाफळे आणि त्यांच्या धाडसी कार्यावर प्रकाश टाकून प्रत्त्येक महिलांनी स्वाती यांचा आदर्श घेतला पाहिजे.’असे सांगितले. प्रा. उज्वला पाटील म्हणाल्या की, ‘भारतात स्त्री-पुरुष समान असताना भारतीय स्त्रिया आणि पाश्चात देशातील स्त्रियांमध्ये फरक आहे. भारतातील महिला जगातील महिलांच्या तुलनेने सर्वात जास्त कष्ट करणाऱ्या आहेत हे जागतिक सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे परंतु त्यांचा म्हणावा तेवढा सन्मान होत नाही.’असे सांगून त्यांनी शांता शेळके यांची स्त्री महात्म्य सांगणारी कविता ऐकविली. यावेळी लीड स्ट्राटेजिस्ट टॅलेंट अॅक्वीझीशन ऑप्सीटो टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेडच्या पद्मजा हुपरीकर यांनी देखील आपल्या मनोगतातून स्त्रीचे महत्व जपण्याचे आवाहन केले. 

पुढे बोलताना प्रमुख पाहुण्या स्वाती चाफळे म्हणाल्या की, ‘मुलींनो शिक्षण घेताना परिस्थितीचा बाऊ करू नका. मी वर्ध्यातून आले तेव्हा एक सामान्य मुलगी होते परंतु आता या स्वेरीमध्ये शिक्षण घेतल्यामुळे मला रोंगे सरांनी एक आत्मविश्वास दिला. त्यामुळे मी आता अशक्यप्राय गोष्टी देखील शक्य करण्याचा नेहमी प्रयत्न करते.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना पो.नि.गावडे म्हणाले की, ‘भारत हे जगात एकमेव राष्ट्र आहे की ज्याला आपण ‘भारत माता’ म्हणून संबोधतो. जगाने मान्य केले आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना सर्वश्रेष्ठ व पूजनीय मानले जाते. हीच माता आता जागृत झाली पाहिजे. आपण धनलक्ष्मी पाहिजे असेल तर लक्ष्मीकडे जातो, बुद्धी पाहिजे असेल तर सरस्वतीकडे जातो, शक्ती पाहिजे असेल तर नवरात्र पाळतो. माझे अशा भोंदुना एकच सांगणे आहे की ‘जीवन जगत असताना जिवंत देवीची पूजा करा म्हणजे सर्व काही मिळेल आणि हे सर्व करत असताना
काम असे करा की नाव झाले पाहिजे आणि नाव असे बनवा की काम झाले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण भारत मातेचा जयजयकार करतो त्याप्रमाणे आपण आपल्या आई आणि बहिणीचाही जयजयकार केला पाहिजे.’ 

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत, शैक्षणिक क्षेत्रातक्रीडाशोध निबंध आणि प्रकल्प, सांस्कृतिक यामध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कमसन्मान चिन्हेसुवर्ण पदके तसेच प्रशस्तीपत्रके देवून गौरविण्यात आले. तसेच पदवी अभियांत्रिकीकडून आठ लाख सत्तावन हजार रुपये तर फार्मसीकडून साठ हजार रुपये इतकी रक्कम बक्षिस स्वरुपात विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदे, विश्वस्त बी.डी. रोंगे, अरुण सालविठ्ठल, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, संस्थेअतर्गंत असणार्‍या फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवेसर्व अधिष्ठातासर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रणीता जाधव, साक्षी काळे आणि प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी आभार मानले.
छायाचित्रः- . व २. दिपप्रज्वलन करताना पुण्यातील मास्टर केमिकल कार्पोरेशन, मास्टर सोल्युशनच्या मानव संसाधन व्यवस्थापिका व स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी स्वाती चाफळे  सोबत डावीकडून विश्वस्त बी.डी. रोंगे, पो.नि.दयानंद गावडे, संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, पद्मजा हुपरीकर, प्रा. उज्वला पाटील, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, इतर मान्यवर .
३. प्रमुख पाहुण्या मानव संसाधन व्यवस्थापिका व स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी स्वाती चाफळे  यांचे स्वेरीच्या वतीने स्वागत करताना  विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे आदी मान्यवर.
४. क्रीडाशोध प्रबंधकलाअभ्यासक्रम अशा विविध विभागात व स्पर्धेत यशस्वी झालेल्या गुणवंताचा पारितोषक देवून गौरविताना मानव संसाधन व्यवस्थापिका व स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी स्वाती चाफळे सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, पद्मजा हुपरीकर, प्रा. उज्वला पाटील, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल व आदी.

add