स्वेरीत इ स्केअर-लॉजिक २ के२० पोस्टरचे थाटात उदघाटन...शनिवारी इ-लॉजिक २के२० स्पर्धेचे आयोजन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 12 March 2020

स्वेरीत इ स्केअर-लॉजिक २ के२० पोस्टरचे थाटात उदघाटन...शनिवारी इ-लॉजिक २के२० स्पर्धेचे आयोजन


Pandharpur Live- शनिवार, दि.१४ मार्च रोजी स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागांच्या संयुक्त विद्यमाने इ स्केअर -लॉजिक २ के २०चे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे,यांनी दिली. या कार्यक्रमाच्या पोस्टरचे उदघाटन नुकतेच महीला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील मास्टर केमिकल कार्पोरेशन, मास्टर सोल्युशनच्या मानव संसाधन व्यवस्थापिका व स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी स्वाती चाफळे, लीड स्ट्राटेजिस्ट टॅलेंट अॅक्वीझीशन ऑप्सीटो टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेडच्या पद्मजा हुपरीकर, न्यू इंग्लिश स्कूल, मंगळवेढाच्या अध्यापिका प्रा. उज्वला पाटील पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, अधिष्ठाता, प्राध्यापक व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.  

         या राज्यस्तरीय उपक्रमात प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, आयडिया प्रेझेंटेशन आणि प्रोग्रामिंग मॅनिया अशा प्रकाराच्या संशोधनात्मक स्पर्धा होणार असून विजेत्यांना रु.एक हजार पासून ते रु.सात हजार पर्यंतचे असे एकूण साठ हजार रुपये पर्यंतची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या एक दिवसीय स्पर्धांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन गुणांना व कल्पकतेला वाव देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार असून आपल्या सादरीकरणामधून नवीन प्रोजेक्ट, आयडिया सादर करता याव्या याच उद्देशाने इ स्केअर -लॉजिक २ के २० स्पर्धेचे आयोजन केले असून उपस्थित विद्यार्थ्यांना रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे. संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभुते व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली इ स्केअर - लॉजिक २ के२०च्या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या स्पर्धेतून भविष्यात अनेक संशोधक निर्माण होतील. समन्वयक डॉ. मिनाक्षी पवार, प्रा. पी.के मगदूम, प्रा. एस.पी. स्वामी, प्रा. एस. अकीरेड्डी हे या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे समन्वयक असून या स्पर्धेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आलेली असून दोन्ही विभागातील प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागासाठी डॉ. मिनाक्षी  पवार (मोबा.नं.-९५४५५५३६६६) आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागासाठी प्रा. पी.के मगदूम (९३२१०९३३१०)  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

छायाचित्र- स्वेरीत इ स्केअर -लॉजिक २ के २०च्या उपक्रमाच्या पोस्टरचे उदघाटन करताना मास्टर केमिकल कार्पोरेशन, मास्टर सोल्युशनच्या मानव संसाधन व्यवस्थापिका व स्वेरीच्या माजी विद्यार्थिनी स्वाती चाफळे, लीड स्ट्राटेजिस्टच्या पद्मजा हुपरीकर, न्यू इंग्लिश स्कूल, मंगळवेढाच्या अध्यापिका प्रा. उज्वला पाटील, पो.नि. दयानंद गावडे,संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. मिनाक्षी  पवार, डॉ.दीप्ती तंबोळी, अधिष्ठाता व इतर मान्यवर.

add