कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सी.ई.टी. क्रॅश कोर्स रद्द - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 20 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सी.ई.टी. क्रॅश कोर्स रद्द

बारावी सायन्सचे विद्यार्थी करू शकतात सी.ई.टी. ची ऑनलाईन तयारी
बारावी सायन्सचे विद्यार्थी करू शकतात सी..टीची ऑनलाईन तयारी
                       पंढरपूर स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून दि. २० मार्च २०२० पासून सी.ई.टी. क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आलेले होते परंतु कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या व पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर सी.ई.टी. क्रॅश कोर्स रद्द करण्यात आलेला आहे.  सर्व महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग ही बंद असल्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सी.ई.टी. परीक्षेची तयारी कशी करावी? हा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आहे.  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना अनुसरून स्वेरी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत आलेली आहे. अशा उपक्रमांचा एक भाग म्हणून स्वेरीने बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सी.ई.टी. परीक्षा सराव पोर्टल आणले आहे. 
              स्वेरीने तयार केलेल्या cet.sveri.ac.in या सराव पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून विद्यार्थी फिजिक्सकेमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयांच्या प्रॅक्टिस टेस्ट्स घर बसल्या व मोफत सोडवू शकतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या पोर्टल च्या माध्यमातून सी.ई.टी. परीक्षेच्या सरावाचे एक दर्जेदार साधन उपलब्ध झाले आहे अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
                            शासनाच्या सी.ई.टी. सेलकडून बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची सी.ई.टी. परीक्षा घेतली जाणार आहे. अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी सदर सी.ई.टी. परीक्षा देणे अनिवार्य असते. या सी.ई.टी. परीक्षेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना स्वेरीच्या या पोर्टलवरील प्रॅक्टिस टेस्टस् ऑनलाईन पद्धतीने सोडवून सराव करता येतो. त्यासाठी विद्यार्थी इंटरनेटशी जोडलेल्या कॉम्प्यूटरलॅपटॉप तसेच स्मार्ट फोनचा वापर करून देखील हे सराव प्रश्न सोडवू शकतात. बहुतेकदा विद्यार्थ्यांना पेन व पेपरच्या सहाय्याने परीक्षा देणे सवयीचे असते. त्यामुळे कॉम्प्युटरवर ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना ते कठीण जाते. या पोर्टल वरील प्रत्येक प्रश्नसंच सोडवण्यासाठी ठराविक वेळ आहे. हे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे आहेत ज्या मध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणून चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्यायाला विद्यार्थी क्लिक करून आपले उत्तर निवडू शकतात व याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. टेस्ट सोडवून झाल्यानंतर आपण सोडवलेल्या प्रश्नांची चुकीची व बरोबर उत्तरे यांची पडताळणी देखील विद्यार्थी या सराव पोर्टलद्वारे करू शकतात. तरीया सुविधेचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. भविष्यातील परिस्थितीनुरूप सदर सी.ई.टी. क्रॅश कोर्स घेणे शक्य झाल्यास तसे विद्यार्थ्यांना कळवले जाईल. सी.ई.टी. परीक्षेच्या विषयांबाबत कांही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. एस. ए. लेंडवे (फिजिक्स-९५४५५५३८७८) प्रा. डॉ. एम. एम. आवताडे (केमिस्ट्री-८३२९३९०८१७) प्रा. डॉ. एच. एच. पवार (मॅथेमॅटिक्स-९८६०१९८५४६) यांच्याशी संपर्क साधावा.

add