स्वेरीज् फार्मसीमध्ये मधुमेहाबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 18 March 2020

स्वेरीज् फार्मसीमध्ये मधुमेहाबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्नपंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी.फार्मसी आणि डी. फार्मसीमध्ये पंढरपुरातील बोरावके हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. गिरीश बोरावके यांनी मधुमेह (डायबिटीस) आजारावर बहुमोल मार्गदर्शन केले.
          न्यू केअर फार्मासुटिकल अॅण्ड न्यू प्रेरणा फाउंडेशन व स्वेरीज फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मधुमेह आजाराबाबत जनजागृती’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रारंभी डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे यांनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ‘मधुमेह’ आजाराच्या जनजागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करावे लागले असे सांगून अभ्यासाचाच एक भाग असल्यामुळे व तज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे या आजाराची कल्पना येते व आपण भविष्यात काळजी घेवू शकतो. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होण्यापुर्वीच काळजी घेतली पाहिजे.’ असेही सांगितले. फार्मसी कंपनीचे वैद्यकीय कार्यकारी अधिकारी सागर धर्माधिकारी आणि पुण्यातील फार्मसी कंपनीचे एरिया मॅनेजर अजित लिंगे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.बोरावके यांनी आपल्या भाषणातून मधुमेह होण्याची कारणे, त्याचे प्रकार, आजाराची लक्षणे, घ्यावयाचा आहार, यावर करायचे उपाय आदी माहिती देवून मधुमेह हा गंभीर आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी आदी माहिती देवून या आजाराची आकडेवारी सादर केली. यावेळी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बोरावके यांना मधुमेह आजाराविषयी अधिक माहिती विचारली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी डी. फार्मसी व बी. फार्मसीचे प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल चाकोरकर यांनी केले तर बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी उपस्थितांचे आभार मानले.
छायाचित्र-१.स्वेरीज् फार्मसीमध्ये डॉ. गिरीश बोरावके यांचे स्वागत करताना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल सोबत, प्रा. रामदास नाईकनवरे व प्राध्यापक वर्ग. २. मधुमेहाबाबत स्वेरी फार्मसीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गिरीश बोरावके.

add