सांगोला तालुका- गरिबाच्या घरावर वीज कोसळली... उघड्यावर पडला संसार... पैसा-अडका, संसारोपयोगी साहित्य जळुन खाक - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 19 March 2020

सांगोला तालुका- गरिबाच्या घरावर वीज कोसळली... उघड्यावर पडला संसार... पैसा-अडका, संसारोपयोगी साहित्य जळुन खाकपंढरपूर लाईव्ह सांगोला-(अशोक पवार)-
सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे एका ऊसतोड कामगाराच्या झोपडीवर वीज कोसळल्याने या गरीब कुटुंबाने कष्टाने गाठीस बांधलेल्या पैशासह त्यांचे सांसारीक साहित्य जळुन खाक झाले आहे.

श्री. विठ्ठल नाथा पारसे रा. हलदहिवडी, तालुक -सांगोला, जिल्हा- सोलापूर या ऊसतोड कामगाराच्या घरावर काल रात्री 8:00 च्या दरम्यान अचानक वीज  कोसळली.  कुडाचे घर असल्याने घरातील साहित्य आणि पैसे वगैरे सर्वकाही जळुन गेले.

काल रात्री सांगोला तालुका परिसरात विजांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. याचवेळी या गरीब कुटुंबाच्या घरावर वीज कोसळली. सदर घटनेचा पंचनामा होणे अत्यावश्यक आहे. जेेेणेकरून
शासकीय मदत मिळुन उघड्यावर पडलेल्या या गरीब कुटुंबाचा संसार पुन्हा उभा राहील.
वीज कोसळली तेंव्हा या कुटुंबातील सर्वजण कुडाच्या झोपडी शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ बसलेले होते. वीजेच्या कडकडाटाच्या आवाजानंतर सर्वजण झोपडीकडे धावले परंतु तोपर्यंत सगळे जळुन भस्मसात झाले होते.

add