शिवनेरी प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वृध्दाश्रमातील वयोवृध्दांना मास्क चे वाटपशिवनेरी प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथील वयोवृध्दांना मास्कचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मागील आठवड्यात राबविण्यात आला.

कोरोना व्हायरस पासून सुरक्षा व्हावी म्हणून आपण सर्वजणांनीच सावधगिरी बाळगावी व शासनाच्या नियमांचे पालन करावे. कोरोना व्हायरसच्या या लढ्यात यशस्वी होण्यासाठी बाहेर पडु नका, वारंवार साबणाने हात धुवा, तोंडावर मास्क लावा. असे आवाहन यावेळी शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे-नाईक यांनी केले.

या वेळी राहुल जाधव सर, रविराज गायकवाड, श्रीमंत ताटे विजय घालमे, गणेश शिंदे (नाईक ), ज्ञानेश्वर गायकवाड, राजू सुरवसे, गणेश बागल, प्रशांत रजपूत, दादा जाधव, गफुर धोत्रे व शिवनेरी प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य उपस्थित होते.