इतिहासात प्रथमच पंढरीच्या पांडुरंगासह राज्यातील देवस्थानांचे दरवाजे दर्शनासाठी बंद - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 March 2020

इतिहासात प्रथमच पंढरीच्या पांडुरंगासह राज्यातील देवस्थानांचे दरवाजे दर्शनासाठी बंद

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच पंढरीच्या पांडुरंगासह राज्यातील देवस्थानांचे दरवाजे दर्शनासाठी बंद करण्यात आले आहेत.

श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बंद करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिर समितीचे सदस्य, आमदार राम कदम यांनी १७ मार्च (मंगळवार) रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

राज्यातील कुठली मंदिरं बंद राहणार?
 1. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर - पंढरपूर
 2. साई बाबा मंदिर - शिर्डी
 3. सिद्धिविनायक मंदिर मुंबई
 4. गणपती मंदिर - गणपतीपुळे
 5. अंबाबाई मंदिर - कोल्हापूर
 6. तुळजाभवानी मंदिर - तुळजापूर
 7. गजानन महाराज मंदिर - शेगाव
 8. खंडोबा मंदिर - जेजुरी
 9. मुंबादेवी मंदिर - मुंबई
 10. एकविरा देवी - कार्ला
 11. महालक्ष्मी मंदिर - सारसबाग
 12. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर - पुणे
 13. प्रभू वैद्यनाथा मंदिर - परळी, बीड
 14. कसबा गणपती - पुणे
 15. दत्त मंदिर - श्री क्षेत्र नृसिंहवाडी
शिवाय, राज्यातील काही मंदिर संस्थानांनी मंदिरं पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. शेगावच्या संत गजानन महाराजांचा रामनवमी उत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र, गजानन महाराजांचे मंदिर हे भक्तांसाठी सुरु राहणार असल्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.
तर, पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र बंद करण्यात आले आहे. 

add