चांगला नागरिक घडविण्यासाठी सिंहगडचे उत्कृष्ट शिक्षण - डॉ. आशा बोकील - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 9 March 2020

चांगला नागरिक घडविण्यासाठी सिंहगडचे उत्कृष्ट शिक्षण - डॉ. आशा बोकील

○ पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ उत्साहात संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
   विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी चांगल्या सुविधा देणा-या शैक्षणिक संस्थेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. पुण्यासारख्या शहरात जे प्रि-प्रायमरी चे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. अगदी त्याच पद्धतीचे शिक्षण पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना दिले जात आहे. पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. स्कूल मधील शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिले जाते असून हे शिक्षण घेत असताना पालकांनी ही आपल्या पाल्यांशी काही गोष्टी शेअर केल्या पाहिजेत. पालक व शिक्षक या दोघांनी एकञ येऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता भारताचा सुजाण नागरिक घडविण्याचे काम पंढरपूर सिंहगड स्कूल मधुन केले जात आहे. आपल्या मुलाच्या भविष्यासाठी सिंहगड सारख्या योग्य शाळेची निवड केल्यानंतर अनेक गोष्टी मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांची आहे. आपला पाल्य भविष्यात चांगला नागरिक घडविण्याचे काम पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल करीत असल्याचे मत डॉ. आशा बोकील यांनी पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रमाणात प्रदान समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
              या दरम्यान अनुपमा देसाई बोलताना म्हणाल्या, प्रत्येक मुलांमध्ये अनेक वेगवेगळे गुण असतात. त्या कला- गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार घेतले पाहिजे असे मत अनुपमा देसाई यांनी बोलताना व्यक्त केले.
     कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक स्कूल च्या वतीने पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. आशा बोकीलअनुपमा देसाईपंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडेस्कूलच्या प्राचार्या स्मिता नवलेप्रा. प्रकाश बोकीलमुख्याध्यापिका स्मिता नायर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
      यावेळी सिंहगड पब्लिक स्कूलच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाबाचे झाड देऊन सन्मान करण्यात आला. पब्लिक स्कूल मधील पुर्व प्राथमिक विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या एकुण १३३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पूर्व प्राथमिक पदवी प्रमाणात प्रदान करण्यात आले.
या दरम्यान उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त करताना पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले. आपल्या पाल्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी खुप मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. शालेय स्तरावरील पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ हा कार्यक्रम पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलने आयोजित केल्याने पालकांमधुन स्कूलचे अभिनंदन व कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन शिक्षिका प्रणोती भांगे व उझमा मुलाणी यांनी क्ले तर उपस्थितांचे आभार रीना सी. डी यांनी मानले.

फोटो ओळी- पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल च्या वतीने पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. आशा बोकील समोर उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग.

add