पंढरपूर सिंहगडच्या उत्कृष्ट शिक्षणामुळे आम्ही जीवनात यशस्वी झालो... पंढरपूर सिंहगड च्या माजी विद्यार्थ्यांचा पुणे येथे मेळावा उत्साहात - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 9 March 2020

पंढरपूर सिंहगडच्या उत्कृष्ट शिक्षणामुळे आम्ही जीवनात यशस्वी झालो... पंढरपूर सिंहगड च्या माजी विद्यार्थ्यांचा पुणे येथे मेळावा उत्साहात

पंढरपूर : प्रतिनिधी 
अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय हे उत्तम काॅलेज असुन विद्यार्थ्यांना संस्कार करून शिक्षण देणारे काॅलेज आहेत. या काॅलेज मध्ये आम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना तेथील शिस्तबद्ध शिक्षणामुळेच आम्ही आज आम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलो असल्याचे मत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पुणे येथील वडगाव सिंहगड इन्स्टिट्यूटचे आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     या मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. संपत देशमुख, प्रा. समीर कटेकर, प्रा. अनिल निकम, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, माजी विद्यार्थी  आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
     माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रास्ताविक करताना प्रा. समीर कटेकर यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्तेची, महाविद्यालयात नामांकित कंपनी येत असल्याचे तसेच महाविद्यालयातील विविध गोष्टीची माहिती उपस्थितांना दिली.
     प्रा. अमोल जगदाळे बोलताना म्हणाले,सध्याचे जग हे खुप धावपळीचे आहे अशा जगात आपण पंढरपूर सारख्या पावण नगरीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. आयुष्य खुप सुंदर आहे. ज्या शहरात तुम्ही जीवन जगत आहेत. त्या शहरात सर्व सुविधा आहेत. आयुष्यात करिअर सोडून भरकटत जाऊ देऊ नका. चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या, महाविद्यालयात येऊन तुमचे अनुभव व नव-नवीन माहिती महाविद्यालयात येऊन शेअर करावेत असे मत प्रा. अमोल जगदाळे यांनी बोलताना व्यक्त केले.
  यावेळी महाविद्यालयाचे अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे बोलताना म्हणाले, तुम्ही असे काम करा की काॅलेज व तुमचं नाव उज्ज्वल झाले पाहिजे. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   या मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील उत्कृष्ट शिक्षण पद्धती यामुळे आम्ही जीवनात यशस्वी झालो आहेत. विद्यापीठात उत्तम शिक्षण देणारे पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याचे मत अनेक माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. या मेळाव्याचे
सुञसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी ज्योत्स्ना राऊत व रोहन देशमुख यांनी केले.

add