पंढरपूर सिंहगडचे प्रा. नंदकिशोर फुले सह चार विद्यार्थ्यांचे गेट परिक्षेत लक्षणीय यश - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 March 2020

पंढरपूर सिंहगडचे प्रा. नंदकिशोर फुले सह चार विद्यार्थ्यांचे गेट परिक्षेत लक्षणीय यश
पंढरपूर: प्रतिनिधी-  कोर्टी (ता पंढरपूर) येथील एस के एन  सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रा. नंदकिशोर फुले यांनी गेट परिक्षेत हॅट्रिक केली असुन महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांनी गेट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

    प्रत्येक वर्षी गेट परिक्षा हि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आय.आय.टी.) यांच्या वतीने घेण्यात येत असतात. यावर्षी फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या गेट परिक्षेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील १ प्राध्यापक व ४ विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन केले आहे.

     राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या गेट परिक्षेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. नंदकिशोर फुले गेट स्कोर ४०७ मिळाला आहे. प्रा. फुले यांनी सलग तीन वेळा गेट परिक्षेत यश प्राप्त करून हॅट्रिक केली असुन महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील संदिप चिकणे यांचा गेट स्कोर ३६९ तर  अनिकेत पाटील यांचा गेट स्कोर ३६५ तसेच सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील राहुल धनवडे यांचा गेट स्कोर ४१० व अभिजीत गवळी चा गेट स्कोर २८५ असा आहे. या सर्वांनी विद्यार्थ्यांनी गेट परिक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे.

    यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, प्रा. संतोष बनसोडे, प्रा. अजीत करांडे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

add