सिंहगडच्या उमा गायकवाडची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतीम फेरीसाठी निवड - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 9 March 2020

सिंहगडच्या उमा गायकवाडची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या अंतीम फेरीसाठी निवड

○ कोल्हापूर विभागातुन प्रथम: निर्भया पथक स्पर्धेत तृतीय क्रमांक
पंढरपूर: प्रतिनिधी
  
कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या वक्ता दशसहस्ञेपु या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या कुमारी उमा गायकवाड या विद्यार्थिनीची मुंबई येथे १७ मार्च रोजी होणा-या राज्यस्तरीय अंतीम वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली  आहे.
      "
वक्ता दशसहस्ञेपु" या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोल्हापूरसोलापूरसातारासांगली जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी १० स्पर्धक सहभागी झाले होते. या अंतिम फेरीत पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड हिने प्रथम क्रमांक मिळविला असुन १७ मार्च रोजी मुंबई येथे होणा-या महा अंतिम स्पर्धेसाठी उमा गायकवाड हिची निवड आहे.
   
८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथील निर्भया पथक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
    
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना देखील मराठी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत उमा गायकवाड हिने  स्वतःकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून मराठी भाषेतून विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन केले आहे.
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडेइलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा. अभिजीत वाडेकरप्रा. अजिंक्य गायकवाड सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
फोटो ओळी: राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या उमा गायकवाड चा सन्मान करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे

add