पंढरपूर सिंहगड मध्ये “ चला उद्योजक होऊया” या विषावर व्याखान - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 5 March 2020

पंढरपूर सिंहगड मध्ये “ चला उद्योजक होऊया” या विषावर व्याखान

Pandharpur Live-
    पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली “ चला उद्योजक होऊया” या विषावर प्रा. शिवाजी पवार यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते.

    यावेळी महविद्यालयाच्या वतीने पुणे येथील राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधनीचे सी.ई.ओ प्रा. शिवाजी पवार यांचे प्रा. श्रीगणेश कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसमोर बोलताना प्रा. शिवाजी पवार म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता नवनवीन उद्योग सुरु केले पाहिजेत. उद्योग सुरु करण्यासाठी शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून उद्योगासाठी कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून आपण आर्थिकसाह्य उपलब्ध करून स्वत:चा उद्योग उभा करू शकता. असे मत प्रा. शिवाजी पवार यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महविद्यालयात बोलताना व्यक्त केले.

             हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. संगमनाथ उप्पीन आदी सह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

add