बॉलीवुड- या अभिनेत्रीच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 1 March 2020

बॉलीवुड- या अभिनेत्रीच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा

Pandharpur Live Online-
कानपूर : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध व्यासपीठांवरुन बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर केंद्र सरकारच्या नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनपीआर, एनआरसी विरोधात वक्तव्य करीत असून याचमुळे स्वरा भास्करच्या अडचणीत वाढ झाली आहे.


बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर इंडस्ट्रीमधील त्या कलाकारांपैकी एक आहे जी सामाजिक प्रश्नांवर अगदी स्पष्टपणे बोलते. अनेकदा स्पष्ट बोलण्यामुळे स्वरा भास्कर अडचणीत अडकली आहे. स्वरा भास्करच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. स्वरा भास्करच्याविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्यांनी दोन समाजात द्वेष निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कानपूरमधील वरिष्ठ वकील विजय बक्षी यांनी स्वरा भास्करविरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल केली आहे. आपल्या वादग्रस्त भाषणांमधून, वक्तव्यांतून दोन समाजामध्ये द्वेष पसरविण्यांचं काम स्वरा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यामुळे जगभर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचं बक्षी यांनी म्हटलं आहे. कानपूरच्या कोर्टात त्यांनी याप्रकरणी याचिका दाखल केलीये. याप्रकरणी २० मार्चला सुनावणी होणार आहे. विजय बक्शी नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. 

विजय बक्शींच्या मते स्वरा भास्कर या अभिनेत्रीसोबतच लोकप्रिय व्यक्ती आहे. त्यांनी आपल्या भाषणांमधून आणि ट्विटमधून प्रत्येकवेळी भारत सरकार, न्यायालय आणि सुऱक्षा रक्षकांवर टिप्पणी केली आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण झाली आहे.

add