कोरोना प्रतिबंधासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाची जनजागृती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 16 March 2020

कोरोना प्रतिबंधासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाची जनजागृती


             पंढरपूर,दि.16: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात  आल्या आहेत. नागरीकांत कोरोनाबाबतच्या प्रतिबंधासाठी शहरात जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती  नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
            कोरोना विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून  दुसऱ्या व्यक्तीस  त्यांच्या संपर्कात आल्याने होत असते. यासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील आवश्यक किराणा माल, भाजीपाला, जीवनाश्यक वस्तू, औषधालये  वगळून  इतर गर्दी होणारे  दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच  नगरापालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश संबधितांना  देण्यात आले आहेत. शहरातील जलतरण तलाव बंद करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी मानोरकर यांनी सांगितले.
        शहरात ठिक-ठिकाणी कोरोनाबाबतच्या प्रतिबंधासाठी माहिती देणारे  होर्डींग लावण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक घंटागाडीव्दारे ध्वनीक्षेपकावरुन नागरीकांना सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरीकांनी घाबरु नये  सावध रहावे  व  प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आंतराष्ट्रीय व देशातंर्गत विमानाव्दारे प्रवास करुन आलेल्या शहरातील  प्रवाशांनी  नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा असे, आवाहन मुख्याधिकारी मानोरकर यांनी  केले आहे.

add