Corona- राज्याच्या काही शहरातील जीम, स्विमिंग पूल, मॉल आज मध्य रात्रीपासुन बंद... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलली महत्त्वाची पावलं - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 13 March 2020

Corona- राज्याच्या काही शहरातील जीम, स्विमिंग पूल, मॉल आज मध्य रात्रीपासुन बंद... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलली महत्त्वाची पावलं


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली आहे. चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी ५:३० नंतर देशात विमानाने येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधल्या जीम, स्विमिंग पूल, मॉल आज रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहेत.

 • राज्यामध्ये एकूण १७ रुग्ण अढळून आले आहेत. यामध्ये मुंबईत तीन, ठाण्यात एक, नागपूरमध्ये एक आणि पुण्यात दहा रुग्ण आहेत.
 • सर्व रुग्णांची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची आहे.
 • पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा पुढील सुचना मिळेपर्यंत बंद राहणार. मुंबई-ठाण्यांमधील शाळांबद्दल सध्या कोणताही निर्णय घेण्यात आलेले नाही.
 • शक्य असेल तिथे घरुन काम करण्याची मूभा म्हणजेच वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी.
 • मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमधील थेअटर्स, स्वीमींगपूल, जीम बंद ठेवण्याचे आदेश.
 • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळावे.
 • आज मध्यरात्रीपासून निर्णय लागू होणार.
 • अनावश्यक प्रवास जनतेने टाळावा.
 • मॉल, हॉटेल सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र अशा ठिकाणे जाणे टाळावे.
 • सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणारे कार्यक्रम टाळावे. अशा राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी परवाणगी मिळणार नाहीत. तसेच याआधी परवानगी मिळाली असेल तर ती रद्द केली जाईल.
 • बस आणि रेल्वे या अत्यावश्यक सेवा असल्याने त्या बंद करता येणार नाहीत. त्यामुळे या सेवा चालू राहणार.
 • दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरुच राहणार. इतर परिक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरु.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा बंद राहणार आहेत, पण इतर शहरांमधल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधल्या शाळा पुढील सूचना येईपर्यंत बंद राहतील. इतर शहरातले मॉल सुरु राहणार, पण तिकडे गर्दी करु नये, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसंच हॉटेलमध्ये जाणंही टाळावं. शक्य असेल तिकडे खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमला परवानगी द्यावी, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे. धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांना परवानगी दिली असेल, तर ती रद्द करावी, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घ्या किंवा उशीरा घ्या, असं आवाहन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. पण परीक्षा उशीरा घेण्यात येतील, कारण पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असं उद्धव ठाकरे विधानसभेत म्हणाले.

राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १७ वर गेली आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत, तर नागपूरमध्ये आणखी २ रुग्ण सापडले आहेत.

add