कोरोनाच्या भीतीने धास्तावलेल्या इंदापूरकरांसाठी डॉ. नागनाथ जगताप व डॉ. संजय सपकळ यांंची महत्वपुर्ण माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 15 March 2020

कोरोनाच्या भीतीने धास्तावलेल्या इंदापूरकरांसाठी डॉ. नागनाथ जगताप व डॉ. संजय सपकळ यांंची महत्वपुर्ण माहितीवालचंदनगर : इंदापूर तालुका शहर व परिसरातील गावात सध्या दिवसा उन्हाचा तडाखा व मध्यरात्रीपासून थंडीचा कडाका वाढून सम-विषम वातावरण बदलाने मानवी जीवनावर परिणाम होत आहे. बालकांसह वृध्द आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कोरोनाच्या भीतीने लोक धास्तावले आहेत. त्यामुळे प्रशासनाने व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी गरज आहे.


इंदापूर तालुक्यात व वालचंदनगर सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला,व संधीवाताने नागरिक त्रस्त असून त्यातच संसर्गजन्य असलेल्या कोरोना व्हायरस व सह्श रूग्ण देशासह राज्यात सापडला आहोत. त्याची भीती ग्रामीण भागातील नागरिकांनाही वाटत आहे. त्यामुळे स्वत :हून अधिक काळजी घेत इतरांनाही याबाबत बोलत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागली असून दिवसा उकाडा रात्री थंडीचा तडाखा या विषम वातावरणाचा

परिणामामुळे विशेषत :वयोवृद्ध व लहान बालके ताप ,अगंदुखी , खोकला, सर्दी, डोके दुखणे, घशात खवखव आदी व्याधीने त्रस्त आहेत. त्यामुळे सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यात रूग्ण वाढत चालले आहेत. तर दुसरीकडे कोरोना ग्रस्त रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

याबाबत प्रशासनाकडून खबरदारी घेत जात असली तरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या नवनवीन अफवांचे पेव फुटले आहे. तर तालुका आरोग्य विभागासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सतर्क नसल्याचे दिसत आहे. कोरोना बाबत ग्रामीण भागात जनजागृती केली जात नसल्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत ग्रामीण भागातील गावागावात कोरोनाबाबत प्रभावी जनजागृती करण्यासाची गरज निर्माण झाली आहे.


नागरिकांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हात साबणाने स्वच्छ धुवावेत,भरपूर पाणी प्यावे, नियमित व्यायामासह संतुलित आहार , खोकताना , शिकताना रूमाल व मास्क वापरावा.तसेच सदी ,खोकला यासारख्या त्रास असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करून सल्ल्यानुसार औषधे घ्यावी.- डाॅ.नागनाथ जगताप

वातावरण बदलांमुळे संसर्गजन्य रोगांच्या रूग्ण संख्येत वाढ होत असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वासन ठेवता प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार व नियमितपणे व्यायाम केला तर या रोगांपासून बचाव करता येऊ शकतो. -डॉ. संजय सपकळ

add