Corona Virus- कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबास केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

Corona Virus- कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबास केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना व्हायरसने मरण पावलेल्या मयताच्या कुटुंबाला केंद्र सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसने मरण पावलेल्या मयताच्या कुटुंबाला केंद्र सरकार 4 लाख रूपयांची आर्थिक मदत करणार आहे. केंद्र सरकारने तशी घोषणा केल्याचं एएनआयने म्हटलं आहे.

         तसंच केंद्र सरकारने कोरोनाला आपत्ती म्हणून देखील घोषित केलं आहे. याचमुळे विविध राज्य सरकारे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी राज्य आपत्ती निधीतून पैसे खर्च करू शकतात.
         दरम्यान, देशातल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना पॉझिटिव्ह 19 रूग्ण सापडले आहेत. तर काही संशयित देखरेखीखाली आहेत.

add