Lock-Down आजपासून रेल्वे, एसटी बससह खाजगी वाहतुक बंद... पुण्यात जमावबंदी - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 23 March 2020

Lock-Down आजपासून रेल्वे, एसटी बससह खाजगी वाहतुक बंद... पुण्यात जमावबंदी


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहून राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यात लोकल वाहतूक, रेल्वे वाहतूक, मेट्रो, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या, खासगी बससह सरकारी बस सेवाही बंद करण्यात आली आहे.

राज्यात रविवारी 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर 7 हजार 452 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परदेशातून आलेले 284 प्रवासीही सर्वेक्षणाखाली आहेत. मात्र, दिवसाला चार-पाचने वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांत दोन अंकी होऊ लागल्याने राज्य सरकारला कठोर निर्णय घेणे भाग पडले आहे.
         राज्यातील शहरे लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रविवारी जनता कर्फ्यूनंतर लगेचच नागरी भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 144 कलमांनुसार आता पाचपेक्षा अधिक माणसांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय लोकल सेवा आणि बेस्ट वाहतूकदेखील बंद करण्यात आली असून एसटी आणि खासगी बसेस बंद करण्यात आल्याची घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. काळ कठीण असून परिस्थिती सुधारली नाही तर हे निर्बंध 31 मार्चनंतरही लागू राहतील, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा
१) आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे.
२) जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा.
३) महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे.

     ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत.
४) जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
५) अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
६) बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील
७) शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील.
८)आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत.
९) ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा.
१०) चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत.
११) ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल
एसटी बस बंद...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात कलम १४४ लागू केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सर्वसामान्य प्रवासासाठी ३१ मार्चपर्यंत एसटी महामंडळाकडून एकही बस सोडली जाणार नाही, पण अत्यावश्यक सेवेसाठी एसटीच्या ५०० बसेस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
रेल्वे मंडळाने देशातील सर्व उपनगरीय लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला.  
         त्याचबरोबर, एसटी महामंडळानेही बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी धावणारी एसटी बंद असली, तरी शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेसाठी ५०० एसटीच्या बसेस धावणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे  कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्याची धोका वाढला आहे. परिणामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात शहरातील वाहतूक व्यवस्थेसोबत ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली एसटी बसही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन असणार आहे. गरज पडल्यास यावर निर्णय घेण्यात असल्याचीही माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तर, लोकल बस वाहतूक ही केवळ अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वर्क फ्रॉम होमचं आवाहनही केलं आहे. तसेच बंदच्या काळात घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे.

जनता कर्प्यु 31 मार्चपर्यंत- आरोग्यमंत्री 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला जनता कर्फ्यूची मुदत रविवारी रात्री 9 वाजता संपणार होती. मात्र आता हा कर्फ्यु 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी पाळण्यात आलेला कर्फ्यु सोमवार सकाळी 5 पर्यंत चालेल व त्यानंतर या कर्फ्युचा दुसरा टप्पा सुरू होणार असून तो 31 मार्चपर्यंत असेल.

31 तारखेपर्यंत राज्यात कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये. या काळात बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस, भाजीपाला, दूध, फळे, हॉस्पिटल, मीडिया, फोन ,इंटरनेट सेवा, पेट्रोलियम, ऑइल, वीज अशा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. त्यामुळे कुणीही जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दी करू नये. तसेच या वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल', असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार सोमवारपासून ते 31 मार्चपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले.


या आदेशानुसार, सोमवारपासून दोन्ही शहरांमध्ये पाच नागरीकांपेक्षा जास्त नागरीकांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी असणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांचे संपुर्ण शहरावर बारकाईने लक्ष असणार आहे.

कोरोनाच्या सद्यस्थितीची आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी राज्यात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यासंदर्भातचा आदेश दिला.

त्यापाठोपाठ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या आदेशाच्या अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम व पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई यांच्याशी संवाद साधला.

''जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार, जमावबंदीच्या आदेशामधून जीवनावश्‍यक वस्तुंना वगळण्यात आले आहे. त्यामध्ये भाजीपाला विक्रेते, किराणा व्यावसायिक, रुग्णालये, वैद्यकीय क्षेत्राचा समावेश केला आहे. मात्र वस्तुंचा साठा करुन गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल.'' असे डॉ.वेंकटेशम यांनी स्पष्ट केले.

जमावबंदीच्या आदेशानुसार पाच व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमता येणार नाही, कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम, इव्हेंट घेता येणार नसल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारच्या 'जनता कर्फ्यु'नंतर रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत डॉ.शिसवे यांच्या आदेशानुसार, शहरामध्ये 144 कलम लागू करण्यात आले होते.

Thank you Punekars, for an extraordinary support to the & your undying commitment to defeat . Please note that the 144 CrPC has been implemented in Pune city
from 9 pm tonight till 5 am (23 March) for a safer Pune. We look forward to your cooperation.
खासगी व सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मनाई :
सर्व कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, ऊरूस, स्पर्धा, व्यायामशाळा, कॅम्प, प्रशिक्षणवर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, सहली.

हे बंद राहणार :
दुकाने, आस्थापना, उपहारगृहे, हॉटेल्स, खानावळ, शॉपिंग कॉम्पलेक्‍स, मॉल्स, सुपर मार्केट, क्‍बल,पबसारखी मनोरंजनाची ठिकाणे, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, चित्रपटगृह, नाट्यगृह, शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये,ऑनलाईन लॉटरी सेंटर, व्हिडीओ पार्लर आदी

जमावबंदीतून वगळलेली क्षेत्र :
शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळे, रुग्णालये, पॅथलॉजी लॅब, दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिग कॉलेज, पेट्रोल पंप, किराणा मालाची दुकाने, दूध, भाजीपाला, जीवनावश्‍यक वस्तु, पाणी, माहिती तंत्रज्ञान, प्रसारमाध्यमे, उत्पादन व निर्मिती केंद्रे
- पूर्वनियोजीत लग्नसमारंभ 25 व्यक्तींपुरता मर्यादीत ठेवावा
अंत्यविधीसाठी गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी.
''कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोमवारी सकाळपासून शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. अत्यावश्‍यक सेवा व सेवा पुरविणाऱ्यांना वगळता जमावबंदीचा आदेश सर्वांना लागू आहे. त्यादृष्टीने नागरीकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.''
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त.

भारतीय दंड विधान संहिता 144 अन्वये राज्यात सर्व शहरात 31 मार्चअखेर जमावबंदी जारी करण्यात आली आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाचपेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल होईल. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिने कारावास अथवा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.

कोरोना विषाणू चार स्टेजमध्ये पसरतो. सध्या देशात आणि राज्यातील सरकार चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळताना दिसत आहे. राजस्थान, पंजाब नंतर आता महाराष्ट्रातही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आलं आहे. आज आपण या आजाराच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहोत. चौथा टप्पा तर खूपच गंभीर असेल. त्याला तोंड देण्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. यासाठी आता सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता तासाला वाढत आली आहे. देशात आता कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 396 साली आहे. तर, आतापर्यंत सात जणांचा यात मृत्यू झाला आहे.

add