Pandharpur- जागतीक महिला दिन- स्फुर्ती फाऊंडेशनने केला महिला न्यायाधीश, महिला पोलिस अधिकारी व् कर्मचार्‍यांचा सन्मान - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 15 March 2020

Pandharpur- जागतीक महिला दिन- स्फुर्ती फाऊंडेशनने केला महिला न्यायाधीश, महिला पोलिस अधिकारी व् कर्मचार्‍यांचा सन्मान


जागतिक महिला दिनाचे औचित्याने स्फूर्ती फाउंडेशन , पंढरपूरच्या वतीने नूतन महिला न्यायाधीश व पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , पंढरपूर शहर पोलीस स्टेशन महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. सचिन ढोले यांचे शुभहस्ते व पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक श्री .अरुण पवार यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .

याप्रसंगी स्फूर्ती फाउंडेशन , पंढरपूरचे अध्यक्ष यशवंत डोंबाळी , सचिव विनायक राऊत , सहसचिवा सौ. मैत्रेयी केसकर , खजिनदार श्री. ईश्वर मोरे व सदस्य समीर दिवाण , सुनिल यारगट्टीकर , सौ. भक्ती रत्नपारखी , कायदेशीर सल्लागार विवेक चौंडावार तसेच नूतन न्यायाधीश मनाली कुलकर्णी , व्ही.व्ही. गिराम त्याचप्रमाणे नोटरी सायली देशपांडे , भारत गदगे , रविराज सोनार , सौ. शोभा माळवे , मंदार केसकर आदि मान्यवर व महिला पोलीस अधिकारी व महिला , पुरूष पोलीस कर्मचारी उपस्थित होते .


स्वागत सौ. भक्ती रत्नपारखी , प्रास्ताविक समीर दिवाण , आभार विनायक राऊत यांनी मानले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मैत्रेयी केसकर यांनी केले .

add