सोलापूर- आज 1 सारी व 12 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले- जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची माहिती - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 29 April 2020

सोलापूर- आज 1 सारी व 12 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले- जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची माहितीपंढरपूर लाईव्ह- सोलापूर मधील कोरोना बाधीतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आजपर्यंत एकुण 1624 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली असुन 1250 व्यक्तींचे  अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी  1169 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आले आहेत तर आजपर्यंत एकुण 81 रुग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत.

आज एकुन नवीन 13 रुग्ण आढळुन आले . यामध्ये 1 रुग्ण सारीचा तर 12 रुग्ण कोरोना बाधीत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली

रुग्णांमध्ये सोलापूर शहरातील सदर बझार परिसर, सिध्दार्थ हौ.सोसायटी परिसर, आंबेडकर नगर परिसर, बीग बझार परिसर, मार्कंडेय नगर, कुमठा नाका परिसर, इंदिरा नगर परिसर आदी भागातील कोरोना बाधीतांचा समावेश आहे. 

आजपर्यंत 81 कोरोना बाधीत आढळुन आले असुन यापैकी 6 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 75 रुग्णांवर सिव्हील हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

add